"जनता उद्या राखी सावंतलाही खासदार बनवेल", कंगनाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर हेमा मालिनींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 07:00 AM2022-09-25T07:00:07+5:302022-09-25T07:01:05+5:30

कंगना राणौतला मथुरेतून भाजपची उमेदवारी मिळणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला होता.

hema malini reacts when asked about speculation kangana ranaut could contest elections from mathura rakhi sawant | "जनता उद्या राखी सावंतलाही खासदार बनवेल", कंगनाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर हेमा मालिनींचा टोला

"जनता उद्या राखी सावंतलाही खासदार बनवेल", कंगनाच्या उमेदवारीच्या प्रश्नावर हेमा मालिनींचा टोला

googlenewsNext

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आता तयारी सुरू केली आहे. एकीकडे भाजपचे नेते विविध राज्यांच्या दौऱ्यावर जात असताना दुसरीकडे विरोधकही महाआघाडीची आखणी करत आहेत. या अनुषंगाने उत्तर प्रदेशातही भाजप जोरदार तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी मथुरा दौऱ्यावर पोहोचल्या होत्या. यादरम्यान कंगना राणौतच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी राखी सावंतचं नाव घेत टोला लगावला.

हेमा मालिनी सध्या मथुरेच्या खासदार आहेत. कंगना राणौतला मथुरेतून भाजपची उमेदवारी मिळणार का, असा सवाल त्यांना करण्यात आला. "खुपच चांगली बाब आहे. माझे विचार देवावर अवलंबून आहेत. कोणी आणखी व्यक्ती जर मथुरेची खासदार बनू इच्छित असेल तर तुम्ही त्याला बनू देणार नाही. तुम्हाला मथुरेत फिल्म स्टारच हवा आहे? उद्या राखी सावंतलाही पाठवाल, ती पण होईल," असं उत्तर हेमा मालिनी यांनी या प्रश्नावर दिलं.


कंगना दोनवेळा वृंदावनमध्ये
कंगना रणौतनं वर्षभरात दोन वेळा वृंदावनचा दौरा केला आहे. काही दिवसांपूर्वीही ती आपल्या कुटुंबीयांसह वृंदावन येथे आली होती. तिनं या ठिकाणी पूजाही केली होती. इमर्जन्सी या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण केलं आहे आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी आपण आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत, असंही तिनं सांगितलं होतं. यादरम्यान तिनं राजकारणाशी निगडीत चर्चांवर उत्तर देणं टाळलं होतं. 

हेमा मालिनींचा दोनदा विजय
मथुरेच्या लोकसभेच्या जागेवरून हेमा मालिनी यांचा दोनदा विजय झाला आहे. पहिल्यांदा त्यांनी २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकदल पार्टीच्या कुंवर नरेंद्र सिंग यांचाही पराभव केला. 

Web Title: hema malini reacts when asked about speculation kangana ranaut could contest elections from mathura rakhi sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.