भागीदाराने कर्मचा-यांच्या मदतीने लावला पाच कोटींचा चुना

By Admin | Updated: March 28, 2015 01:43 IST2015-03-28T01:43:46+5:302015-03-28T01:43:46+5:30

पुणे : भागीदार आणि कर्मचा-यांनी मिळून मोबाईल खरेदी विक्रीच्या व्यवसायात असलेल्या व्यावसायिकाला तब्बल पाच कोटी रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

With the help of the employee, the participants chose five crores | भागीदाराने कर्मचा-यांच्या मदतीने लावला पाच कोटींचा चुना

भागीदाराने कर्मचा-यांच्या मदतीने लावला पाच कोटींचा चुना

णे : भागीदार आणि कर्मचा-यांनी मिळून मोबाईल खरेदी विक्रीच्या व्यवसायात असलेल्या व्यावसायिकाला तब्बल पाच कोटी रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन शंकरराव जोशी (वय ४४, रा. ओंकार अभियान अपार्टमेंट, कर्वेनगर), रेखा संदीप मालवदे (वय ३२, रा. ईशा मिरॅकल, कोंढवा), मंगेश जयवंत भागवत (वय ४४, रा. न्यु मोदीखाना, लष्कर), उदय जोशी (रा. प्रेस कॉलनी, जेल रोड, येरवडा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मेहराण इराणी (वय ५७, रा. बंडगार्डन) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणी आणि जोशी यांनी एकत्रित भागीदारीमध्ये मोबाईल खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता. एस. एस. झेड कॉर्पोरेशन या नावाने हा व्यवसाय सुरु होता. जोशी यांना व्यवसायातील खरेदी विक्रीचा व्यवहार आणि संबंधित खाते सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
त्याबदल्यात त्यांना वेगळा पगार आणि मोबदलाही देण्यात येत होता. तसेच रेखा आणि मंगेश हे दोघेही कंपनीमध्ये नोकरीस होते. या सर्वांनी आपसात संगनमत करुन वेगवेगळ्या ग्राहकांना मोबाईल विक्री केली. त्याबदल्यात आलेली रक्कम कंपनीच्या खात्यात न भरता स्वत:च्या खात्यामध्ये भरुन कंपनीची पाच कोटींची फसवणूक केली.

Web Title: With the help of the employee, the participants chose five crores