शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

उत्तर प्रदेशमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, पायलटचा जागीच मृत्यू

By सायली शिर्के | Published: September 21, 2020 3:09 PM

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाली असून वेगाने बचावकार्य सुरू आहे.

आझमगड - उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. सरायमीर भागातील कुसहां गावाजवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात पायलटचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाली असून वेगाने बचावकार्य सुरू आहे. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तेथून जवळपास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात पायलटचा मृतदेह सापडला आहे. 

हेलिकॉप्टर कोसळल्याने त्याचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. आझमगडचे जिल्हाधिकारी अरूण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान हे अमेठीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अ‍ॅकेडमीचं (IGRUA) आहे. त्यामुळे याबाबत अमेठीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली आहे. शेतातील चिखलात हे हेलिकॉप्टर कोसळल्याने पोलिसांना काही समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच लोकांनी देखील पाहण्यासाठी गर्दी केली आहे. 

 एका पायलटचा जागीच मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, आझमगडमध्ये खराब हवामानामुळे सकाळी 11 च्या सुमारास एक टू-सीटर चार्टर्ड एयरक्राफ्ट टीबी20 क्रॅश झालं आहे. तर या दुर्घटनेत एका पायलटचा जागीच मृत्यू झाला आहे. तर हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरू आहे. हेलिकॉप्टर शेतात कोसळताना काही स्थानिकांना दिसलं होतं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ते अधिक तपास करत आहे. मात्र घटनास्थळी लोकांनी गर्दी केल्याने पोलिसांनाही तपासात काही अडचणी येत आहेत.

ग्रामस्थांना हेलिकॉप्टर कोसळताना दिसलं

वाराणसी विमानतळाहून  हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं होतं. तसेच हेलिकॉप्टरमध्ये असलेली दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात हेलिकॉप्टर कोसळल्याचं समजल्यानंतर काही जणांनी शेताकडे धाव घेतली. या लोकांना हेलिकॉप्टर कोसळताना दिसलं. याच दरम्यान दोघे जण पॅराशूटच्या सहाय्याने खाली आलेले दिसल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले

मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार

कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात भारी, 'ही' आकडेवारी सुखावणारी

"जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय"

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूpilotवैमानिक