कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स

By सायली शिर्के | Published: September 21, 2020 11:18 AM2020-09-21T11:18:21+5:302020-09-21T11:27:08+5:30

भाजपाच्या एका आमदाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

bjp mla madhu shrivastav recovered from corona and danced without mask vadodara | कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स

कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 54,87,581 वर पोहोचला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 86,961 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,130 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 87,882 लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे अनेकांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सध्या भाजपाच्या एका आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद' झाला असून मास्क न लावता मंदिरात डान्स केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मधू श्रीवास्तव असं या भाजपा आमदाराचं नाव आहे. त्यांनी कोरोनावर मात केली आहे. गुजरातच्या वडोदरा येथील एका मंदिरात त्यांनी मास्क न लावता डान्स केला आहे. तर त्याचवेळी भजन-कीर्तन सुरू असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. डान्स करताना श्रीवास्तव यांना नियमांचा विसर पडला आहे. सोशल मीडियावर त्याच्या या डान्सचा व्हायरल तुफान व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मधू श्रीवास्तव यांना कोरोनाची लागण झाली होती. 

भाजपा आमदाराचा Video जोरदार व्हायरल

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई जिंकली आहे. तसेच क्वारंटाईनचा कालावधीही पूर्ण केला आहे. कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी आनंदाच्या भरात मंदिरात सुरू असलेल्या भजनावर डान्स केला आहे. मात्र मास्क न लावता डान्स केल्याने अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला असून जोरदार टीका देखील केली आहे. श्रीवास्तव यांच्या डान्स सुरू असताना मंदिरात पुजाऱ्यांसह इतरही काही लोक उपस्थित असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

"मी मंदिराचा मालक आहे आणि मंदिरात मास्क घालणं गरजेचं नाही"

एका इंग्रजी वृत्तपत्राने मधू श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "मी मंदिरात डान्स करतानाचा व्हिडीओ खरा आहे. मी प्रत्येक शनिवारी हे करतो. गेल्या 45 वर्षांपासून मी मंदिरात जात आहे. यात काहीही नवीन नाही. मी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. सरकारने एकत्रित येण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तिथे काही मोजके लोक होते. या मंदिराचा मी मालक आहे आणि मंदिरात मास्क घालणं गरजेचं नाही" असं श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात भारी, 'ही' आकडेवारी सुखावणारी

"जो शेतकरी जमिनीतून सोने उगवतो, त्याच्या डोळ्यांत मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय"

PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...

"मोदीजी, शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवताहेत; सरकारचा कृषि विरोधी काळा कायदा"

भयंकर! मुलाच्या हव्यासापायी पतीने गर्भवती पत्नीच्या पोटावर केले वार

 

Web Title: bjp mla madhu shrivastav recovered from corona and danced without mask vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.