महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:55 IST2019-08-08T13:54:01+5:302019-08-08T13:55:14+5:30

केरळ, ओडिसा, मध्य प्रदेश राज्यांनाही पावसाचा फटका बसला आहे.

Heavy rains lash across the country, including Maharashtra | महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा फटका

महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा फटका

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील सखर भागातील वस्त्यांमध्ये पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. शहरातून पश्चिमेला कोकणाशी असणारा संपर्क तुटला असून वाहतूक ठप्प आहे. तर गडचिरोली, अमरावतीमध्येही पावसाचा फटका बसला आहे. 

कर्नाटकात कोडागू, धारवाड, मंगळुरु, हासन, बेळगाव, म्हैसूर, कारवार आणि उडपी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. याचबरोबर, केरळ, ओडिसा, मध्य प्रदेश राज्यांनाही पावसाचा फटका बसला आहे.

 

Web Title: Heavy rains lash across the country, including Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.