शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

मध्य महाराष्ट्र, कोकण, गोव्यात 'पर्जन्य राज' ; रायगड, पालघरला अतिवृष्टीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 21:30 IST

मॉन्सूनने गुजरातमधील कांडला, अहमदाबाद, नरसिंगपूर, उमारिया,बालियापर्यंत मारली मजल..

ठळक मुद्दे पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात १६ जूनला जोरदार पावसाची शक्यता सातारा, बीड आणि लातूरला मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने आज उत्तर अरबी समुद्र, गुजरात राज्याच्या काही भागात, दिवचा संपूर्ण भागात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगड, झारखंड व बिहारच्या उर्वरित भागात, पूर्व उत्तर प्रदेशाच्या काही भागात वाटचाल केली. कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात व विदर्भात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रायगड जिल्ह्यात मंगळवारी तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून पालघर जिल्ह्यात बुधवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मॉन्सूनने गुजरातमधील कांडला, अहमदाबाद, नरसिंगपूर, उमारिया,बालियापर्यंत मजल मारली आहे.

गेल्या २४ तासात राज्यात कणकवळी ८०, पालघर ७०, लांजा, माणगाव ६०, सावंतवाडी, वालपोई ५०, मोखेडा, मुरुड, केप, रत्नागिरी ४०, कानकोना,चिपळूण, डहाणु, खेड, महाड, मुंबई (कुलाबा), पेडणे, फोंडा, राजापूर,संगमेश्वर, देवरुख, वैभववाडी ३० मिमी पावसाची नोंद झाली होती.  मध्यमहाराष्ट्रातील गगनबावडा, महाबळेश्वर ५०, पाथर्डी ४०, आजारा, खटाव, वडुज,पन्हाळा, यवल ३०, पुरंदर, सासवड, राधानगरी, शाहूवाडी, वेल्हे येथे २०मिमी पाऊस झाला.

मराठवाड्यात धर्मबाद, परभणी, सेनगाव ३०, जळकोट, लातूर, पालम २० मिमी पाऊस पडला. विदर्भातील चंद्रपूर ६०, नागपूर, सेलू ४०, बल्लारपूर, भद्रावती,चिखलदरा, कळंब, मोर्शी ३०, चांदूर बाजार, चिमूर, देवळी, दिग्रस,हिंगणघाट, मालेगाव, मंगलूरपीर, नेर, वरोरा, वाशिम येथे २० मिमी पावसाचीनोंद झाली होती. घाटमाथ्यावर कोयना (पोफळी) ३०, शिरगाव दावडी, कोयना(नवजा), ताम्हिणी २० मिमी पाऊस झाला............................

इशारा :१६ जून रोजी कोकण, गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाततुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. १७ जून रोजी कोकण,गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.........रायगड जिल्ह्यात १६ जूनला तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यात १६ जूनला जोरदार पावसाची शक्यता आहे. सातारा, बीड आणि लातूरला मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ जूनपर्यंत सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यात १७ जूनला अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानMonsoon Specialमानसून स्पेशलMarathwadaमराठवाडाVidarbhaविदर्भ