शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

फुलंब्री तालुक्यात जोरदार पावसाने मोठे नुकसान

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

नाल्याच्या काठावर असलेली घरे पडली - खते, धान्य भिजली

नाल्याच्या काठावर असलेली घरे पडली - खते, धान्य भिजली
फुलंब्री : तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असल्याने शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वाकोद येथे अनेक घरे पडली. जीवनावश्यक सामान वाहून गेले.
फुलंब्री तालुक्यावर वरूण राजाची कृपा झाल्याने ७ जूनपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंद असला तरी काही गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आळंद, खामगाव भागात रविवारी मुसळधार पाऊस पडल्याने खामगाव येथील तलाव तुडंूब भरला. सांडव्याद्वारे पाणी खाली नाल्याला आल्याने वाकोद येथील शेतकर्‍याची या नाल्याच्या काठावर बांधली होती ती घरे पडली. घरातील खते, बियाणे, भांडे, धान्य, चारा, वाहून गेली.
शेतकरी एकनाथ महादू ताठे, रघुनाथ काळूबा ताठे, पंडीत बंडू ताठे, अशोक बाबूराव ताठे, सोमीनाथ पाटीलबा ताठे, जयवंता दादा कापडे, सुभाषदादा कापडे, हारुणाबाई बयाजी कापडे, सर्जेराव बाजीराव कापडे, कडूबा भाऊलाल कापडे, नागोराव ताठे, लक्ष्मण ताठे, दिनकर कापडे, शालिकराव घुगे यांची राहती घरे पडली. धान्य, खते, बिजली, भांडे वाहून गेली. नाल्याच्या दुसर्‍या बाजूला असलेल्या वस्तीवरील लोकांना गावात येता आले नाही.
तलाव फुटल्याची अफवा- खामगाव येथील तलाव फुटल्याची अफवा पसरल्याने रविारी रात्रीला नाला काठावर राहणार्‍या व खामगाव येथील नागरिकात भितीचे वातावरण पसरले होते. रात्री प्रत्यक्षात तलावानजीक जाऊन खात्री केल्यानंतर नागरिक निवांत झोपले.
तहसीलदार यांची भेट
दरम्यान खामगाव येथील तलाव फुटल्याची अफवा पसरल्यानंतर तहसीलदार किशोर देशमुख, गटविकास अधिकारी शिवाजी माने यांनी तलावावर जाऊन पाहणी केली. तलाव फुटणार नसल्याचे तहसीलदार यांनी सांगितले.
सोमवारी दुपारी चार वाजेच्यादरम्यान तालुक्यात जोरदार पाऊस सुरू होता. गिरजा, फुलमस्ता नदीला पाणी आले, तसेच तालुक्यातील गणोरी, जातेगाव, बाभूळगाव येथील तलावात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पाणी आले आहे. सांजूळ, वाकोद, फुलंब्री प्रकल्पात अल्प साठा आला.
चार वर्षाची आकडेवारी - फुलंब्री तालुक्यात गेल्या चार वर्षात कालांतराने पाऊस कमी पडत आहे; पण यंदा केवळ नऊ दिवसात तालुक्यात ७६९ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.
२०१२ साली पूर्ण वर्षभर सरासरी ३३३
२०१३ साली वर्षभरात सरासरी ७५४
२०१४ साली वर्षभरात सरासरी ४९८
२०१५ चालू वर्षी केवळ नऊ दिवसात १९२ मि.मी. पाऊस पडला आहे.