दिल्लीतील पॅन्ट फॅक्ट्रीला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 3 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 00:34 IST2024-02-16T00:33:41+5:302024-02-16T00:34:27+5:30
अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे समजते.

दिल्लीतील पॅन्ट फॅक्ट्रीला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू, 3 जखमी
दिल्लीतील अलीपूर येथे एका पेंट फॅक्टरीला भीषण आग लागली असून या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्या. या अपघातात तीन जण जखमी झाल्याचेही समजते. अद्याप मृतांची ओळख पटू शकली नाही. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे समजते.
ही आग अत्यंत भयंकर होती. काही किलोमीटर अंतरावरूनही ही आग दिसत होती. यावेळी धुराचे लोटही मोठ्या प्रमाणावर दिसत होते. ही आग एवढी भयावह होती की, कामगारांना कारखान्यातून बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही आणि 7 जणांचा जळून मृत्यू झाला.
#WATCH | Delhi: A fire broke out at the main market of Alipur. Fire tenders at the spot, efforts to douse the fire underway. pic.twitter.com/M5dvY3Q6er
— ANI (@ANI) February 15, 2024
जवळपासची दुकानंही भक्षस्थानी -
या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात, कारखान्याला लागलेली भीषण आग आणि आकाशात उंच-उंच जात असलेले धुराचे लोट दिसत आहेत. ही आग एवढी भीषण होती की, आजूबाजूच्या दुकानांनाही आगीने आपल्या कवेत घेतले. या घटनेत कारखाना जळून राख झाला आहे.