शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात...! बसची ट्रेलरला धडक, ६ ठार, ७ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 21:17 IST

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

राजस्थानातील बालोतरा जिल्ह्यातील सरवडी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी भीषण अपघात झाला. महामार्गावरून जाणाऱ्या एका स्लीपर बसने समोर जात असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की बसची उजवी बाजू पुर्ण पणे क्षतिग्रस्त झाली. या अपघातात ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर झाल्याचे समजते.

प्रवाशांचे मृतदेह बसच्या खिडक्यांबाहेर लटकलेल्या अवस्थेत दिसले - अपघातानंतर घटनास्थळी अतिशय विदारक दृश्य बघायला मिळाले. माध्यमांतील वृत्तांनुसार, ही धडक एवढी भीषण होती की काही प्रवाशांचे रक्ताळलेले मृतदेह बसच्या खिडक्यांमधून बाहेर लटकलेल्या अवस्थेत होते. या भयानक दृश्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान हायवेच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले.

ग्रीन कॉरिडोरद्वारे जखमींवर उपचारजखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ७ प्रवाशांची प्रकृती अत्यंत गंभीर असून, त्यांना 'ग्रीन कॉरिडोर' तयार करून जोधपूरमधील मथुरा दास माथूर रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत प्रवाशांचे देह नाहटा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले असून, त्यांची ओळख पटवून नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे.

या भीषण अपघातानंतर पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Horrific Bus-Trailer Collision in Rajasthan: Six Dead, Seven Critically Injured

Web Summary : A devastating bus accident in Rajasthan killed six and critically injured seven. A sleeper bus collided with a trailer on a highway. The impact was severe, leaving a gruesome scene. Injured were rushed to Jodhpur via green corridor.
टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल