प्रेमासाठी काय पण! तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जडला जीव; मुलासाठी घरदार सोडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 12:11 PM2021-09-28T12:11:22+5:302021-09-28T12:12:48+5:30

Crime News : तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

up heart of three sisters came on same young man in rampur all four absconded from house | प्रेमासाठी काय पण! तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जडला जीव; मुलासाठी घरदार सोडलं अन्...

प्रेमासाठी काय पण! तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जडला जीव; मुलासाठी घरदार सोडलं अन्...

Next

नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. तीन सख्ख्या बहिणींचा एकाच तरुणावर जीव जडल्याची अजब घटना आता समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबीयांनी विरोध केल्यावर मुलासाठी या तिघींनी घरदार सोडलं आहे. उत्तर प्रदेशातील रामपूरमध्येही ही घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन सख्ख्या बहिणींचं गावातील एकाच तरुणावर प्रेम जडलं. पण त्यांचं हे प्रेम फार काळ लपून राहिलं नाही. 

चौघांच्या या हटके प्रेमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना जेव्हा याबाबत कळलं तेव्हा त्यांनी याला कडाडून विरोध झाला. त्यावेळी या मुली मुलासोबत घर सोडून पळून गेल्या आहेत. बेपत्ता झालेल्या मुलींचा सध्या नातेवाईक शोध घेत आहेत. अजीमनगर पोलिस ठाण्याच्या परिसरातील एका गावात या घटनेने खळबळ उडाली आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वी एका गावातील तीन सख्ख्या बहिणी घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्या. अचानक तिन्ही मुली बेपत्ता झाल्याने कुटुंबीय आणि नातेवाईक घाबरले. सुरुवातीला कोणालाही याबाबत काहीही न सांगता आधी आपल्या परिने मुलींचा शोध सुरू केला. 

तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत

नातेवाईकांकडे मुलींचा शोध घेतला. ओळखीच्या व्यक्तींकडे तपास केला, पण मुलींचा कुठेच पत्ता लागला नाही. याच दरम्यान गावात ही बातमी पसरली. बेपत्ता असलेल्या तिन्ही बहिणी या एका तरुणासोबत पळून गेल्याचं म्हटलं जात आहे. यातील एक बहिणी ही अल्पवयीन आहे. तिन्ही बहिणी एकासोबत पळून गेल्याने गावकरीही चकीत झाले आहेत. दुसरीकडे त्यांचे कुटुंबीय अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांना अद्याप या घटनेची माहिती देण्यात आलेली नाही. तीन बहिणी बेपत्ता झाल्याची कुठलीही तक्रार कुटुंबीयांकडून अद्याप आलेली नाही. पण त्यांनी तक्रार दाखल केल्यास पोलीस त्यांना नक्कीच मदत करतील, असं अजीमनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी रविंद्र कुमार यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

...अन् प्रेमाचा झाला दुर्दैवी अंत! लग्न न झाल्याने प्रेमीयुगुलाची आत्महत्या; एकाच झाडाला घेतला गळफास

राजस्थानच्या डूंगरपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रेमीयुगुलाने लग्न करणं शक्य नसल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करून जीवन संपवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासोबत लग्न होण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे प्रियकर आणि प्रेयसी यांनी एकत्र गळफास घेतल्याची घटना घडली आहे. दोघांनी एकाच ओढणीने कंबरेला बांधून आणि नंतर झाडाला गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. एकमेकांसोबत लग्न होऊ न शकल्याने या दोघांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: up heart of three sisters came on same young man in rampur all four absconded from house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app