जिच्यासोबत लग्नं ठरलं, साखरपुडा झाला; तिचाच अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 19:54 IST2025-12-22T19:53:02+5:302025-12-22T19:54:50+5:30
Uttar Pradesh Crime News: जिच्यासोबत लग्न ठरलं, साखरपुडाही झाला तिच्याच विश्वासाचा घात करत तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याची तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील कौशांबी येथे घडली आहे.

जिच्यासोबत लग्नं ठरलं, साखरपुडा झाला; तिचाच अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला, त्यानंतर...
जिच्यासोबत लग्न ठरलं, साखरपुडाही झाला तिच्याच विश्वासाचा घात करत तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तिचा अश्लील व्हिडीओ तयार केल्याची तसेच या व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील कौशांबी येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कौशांबी जिल्ह्यातील मंझनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका तरुणीचं लग्न प्रयागराज येथील उत्कर्ष अग्रवाल याच्यासोबत निश्चित झालं होतं. लग्नाची वरात निघण्यापूर्वीच वधू पक्षाची मंडळी पोलीस ठाण्यात पोहोचली. त्याचं झालं असं की, आरोपी उत्कर्ष अग्रवाल याने साखरपुडा झाल्यानंतर त्याच्या होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून या कॉलदरम्यान, अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केला. तसेच नंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १ कोटी रुपयांचा हुंडा देण्याची मागणी केली.
या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी एसपी राजेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुण, त्याचे आई-वडील आणि बहिणीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपी तरुण उत्कर्ष आणि पीडित तरुणीचा ९ जून २०२५ रोजी साखरपुडा झाला होता. तर ८ फेब्रुवारी २०२६ ही लग्नासाठीची तारीख निश्चित करण्यात आली होती. साखरपुडा झाल्यानंतर आरोपी तरुण उत्कर्ष याने त्याची होणारी पत्नी असलेल्या पीडित तरुणीसोबत फोनवरून बोलण्यास सुरुवात केली. याचदरम्यान, त्याने या तरुणीचे काही खाजगी क्षण चित्रित करून अश्लील व्हिडीओ तराय केले. तसेच पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी खंडणीचे १ कोटी रुपये देण्यास नकार दिल्यावर आरोपीने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.
याबाबत पीडित तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, हे लग्न २५ लाख रुपयांमध्ये निश्चित करण्यात आले होते. मात्र साखरपुड्यानंतर उत्कर्ष आणि त्याचे वडील शोभित अग्रवाल यांनी अचानक १ कोटी रुयांची मागणी केली. जेव्हा ते याबाबत बोलणी करण्यासाठी प्रयागराज येथील उत्कर्षच्या घरी गेले तेव्हा त्याची आई शिप्रा आणि बहीण नियती हिने त्यांना शिविगाळ करून अपमानित केले. तसेच पैसे मिळाले नाहीत तर लग्न मोडून तरुणीला बदनाम करू अशी धमकी त्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंदवून घेत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.