पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:36 IST2025-07-02T11:34:50+5:302025-07-02T11:36:34+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर पती आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलाची जागा निवडली. पण पुढे काय घडलं?

He had an argument with his wife and came to the flyover to commit suicide; watch the video of what happened next | पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा

पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा

पत्नीला घेऊन जाण्यासाठी तो सासुरवाडीत आला. पण, तिने सोबत यायला नकार दिला. त्यामुळे तो रागावला आणि थेट उड्डाणपूलच गाठला. एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात एक व्यक्ती उड्डाणपूलावरून आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पूलाच्या कठड्यावर बसली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील घटना आहे उत्तर प्रदेशातील. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आलेल्या व्यक्ती फरुखाबादचा रहिवासी आहे. तो ताजगंज येथील रामनगरमध्ये आला होता. पत्नीला परत घरी घेऊन जाण्यासाठी आला, पण पत्नीचं आणि त्याचं भांडण झालं. 

पत्नीने त्याला सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला राग आला आणि जीव संपवण्याचा विचाराने तो उड्डाण पूलावर गेला. कठड्यावर गेल्यानंतर लोकांचे त्याच्याकडे लक्ष गेले आणि गोंधळ उडाला. रिंग रोड उड्डाणपूलावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलीस पोहोचले आणि त्याला वाचवले. 

व्हिडीओमध्ये पोलीस सावधपणे त्याच्या मागून येतो आणि त्याला धरून मागे खेचत असल्याचे दिसत आहे. तो व्यक्ती उड्डाणपूलावर चढल्यानंतर खाली जमलेल्या गर्दीतील कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली. त्यामुळे पोलीस वेळीच तिथे पोहोचू शकले आणि त्याचा जीव वाचला. 

Web Title: He had an argument with his wife and came to the flyover to commit suicide; watch the video of what happened next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.