शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस बलात्कार प्रकरण : आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाखांचे बक्षीस, विश्व हिंदू सेनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 17:30 IST

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर अमानूष पद्धतीने बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी केली आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे एका तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि तिच्या हत्येमुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणातील दोषी आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, एका तरुणीवर अमानूष पद्धतीने बलात्कार करणाऱ्या चार आरोपींचे गुप्तांग कापणाऱ्यास २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक यांनी केली आहे.विश्व हिंदू सेनेचे प्रमुख अरुण पाठक हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना नेपाळमधील एका तरुणाचे मुंडण केले होते. त्यानंतर वाराणसी पोलिसांनी अरुण पाठक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. तसेच विश्व हिंदू सेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली होती. मात्र अरुण पाठक हे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.आता अरुण पाठक यांनी सोशल मीडियावरून आपले एक वक्तव्य व्हायरल केले आहे. या व्हिडीओमधून अरुण पाठक यांनी योगी सरकारवर गंभीर आरोप करत दोषी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच सरकारने पीडित तरुणीवर ज्या प्रकारे अंत्यसंस्कार केले आहेत ते योग्य नाहीत. आता जी व्यक्ती या प्रकरणातील चारही आरोपींचे गुप्तांग कापेल. त्याला विश्व हिंदू सेनेकडून २५ लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा पाठक यांनी केली आहेअरुण पाठक यांनी आपली ही विधाने सोशल मीडियावर फेसबूक, ट्विटरच्या माध्यमातून व्हायरल केली आहेत. यामध्ये सरकारसह पोलिसांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अरुण पाठक हे सध्या फरार असून, वाराणसी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कारहाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत. 

 

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश