शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

दिल्लीला उडवण्याचा कट उधळला, 4 संशयित दहशतवादी अटकेत; नांदेडच्या रिंदाशी संबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 15:18 IST

आयबी, पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 4 संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा मोठा कट करनाल पोलिसांनी उधळून लावला आहे. हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातून 3-4 संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या चार संशयितांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे चौघेजण  नांदेडला जात होते. दरम्यान, दिल्लीत मोठा कट घडवून आणणार होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

RDX असण्याची शक्यताकरनालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून एक बंदूक, मोठ्या प्रमाणात गोळ्या, 3 आयईडी आणि गनपावडरचे कंटेनर जप्त केले आहे. ही गनपावडर RDX साठी वापरली जाणार होती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दारुगोळा सापडला आहे की, यातून अनेक शहरात मोठे बॉम्बस्फोट घडवले जाऊ शकले असते.

दहशतवादी नांदेडला जात होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघेही पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी आयबी, पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पकडलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचे वय सुमारे 20-25 वर्षे आहे. हे लोक पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते.  

मोस्ट वॉन्टेड रिंदाशी संबंधहे चौघे खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग उर्फ ​​रिंदा याच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंदा हा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून तो सध्या पाकिस्तानात लपला आहे. कर्नाल येथील बस्तारा टोलनाक्यावरुन एक इनोव्हा वाहनातून हे चौघे जात होते. गुरप्रीत, अमनदीप, परमिंदर, भूपिंदर अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे असल्याची माहिती कर्नालचे पोलीस अधीक्षक गंगा राम पुनिया यांनी दिली आहे. रिंदा याने ही शस्त्रे पाकिस्तानातून फिरोजपूरमध्ये ड्रोनद्वारे पाठवली होती. 

टॅग्स :delhiदिल्लीBombsस्फोटकेBlastस्फोटPoliceपोलिसterroristदहशतवादीNandedनांदेड