शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

Exit Poll: हरयाणात भाजपाच्या लाटेत विरोधकांची वाट; काँग्रेस सपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 10:35 PM

हरयाणात भाजपा सत्ता राखणार; जागाही वाढणार

मुंबई: महाराष्ट्रासोबतच आज हरयाणाच्या विधानसभा निवडणुकीचं मतदानदेखील पार पाडलं. या राज्यातही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याची आकडेवारी विविध एक्झिट पोलमधून समोर आली आहे. महाराष्ट्रात भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरणार असला तरी तो एकहाती सत्ता मिळवेल, अशी शक्यता कमी दिसते. मात्र हरयाणात भाजपा स्वबळावर सत्ता राखणार आहे. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत काठावरचं बहुमत मिळवणाऱ्या भाजपाची कामगिरी यंदा मोठ्या प्रमाणात सुधारेल, असे आकडे सांगतात. हरयाणात विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यामुळे बहुमतासाठी 46 जागांचा जादुई आकडा गाठा लावतो. गेल्या निवडणुकीत भाजपाला 47 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र आज मतदान संपल्यानंतर समोर आलेले विविध एक्झिट पोल पाहता भाजपाची सत्ता कायम राहील, असा अंदाज आहे. सर्व एक्झिट पोलची सरासरी काढल्यास भाजपाला 66 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसच्या जागा 13 वर येऊ शकतात. या निवडणुकीत इतरांना 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. 2009 मध्ये हरयाणात भाजपाला अवघ्या 4 जागा मिळाल्या होत्या. यानंतर 2014 मध्ये भाजपाच्या जागा थेट 47 वर गेल्या. याच कालावधीत काँग्रेसची कामगिकी मात्र घसरत गेली. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 35 जागा मिळाल्या होत्या. विशेष म्हणजे त्याआधीच्या निवडणुकीत काँग्रेसला 67 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये काँग्रेसला राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यानंतर काँग्रेसची राज्यातील कामगिरी आणखी खालावली. 

विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलची आकडेवारीटाईम्स नाऊभाजपा- 71काँग्रेस- 11इतर- 8

जन की बातभाजपा- 57काँग्रेस- 17इतर-16

न्यूज एक्सभाजपा- 77काँग्रेस- 11इतर- 2

टीव्ही9 भारतवर्षभाजपा- 47काँग्रेस- 23इतर- 20

न्यूज18- आयपीएसओएसभाजपा- 75काँग्रेस- 10इतर- 5

सी व्होटरभाजपा- 72काँग्रेस- 8इतर- 10

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस