शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 18:58 IST

Haryana Assembly Election 2024:

हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान काही वेळापूर्वीच आटोपलं आहे. अत्यंत चुरशीच्या वातावरणामध्ये झालेल्या या मतदानादरम्यान, काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान, गुरुग्राममधील बरोदा येथील महमूदपूर गावात काँग्रेसला मतदान केल्याच्या रागातून एका मतदाराला काही तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मदन लाल नावाचे गृहस्थ मतदान केंद्रामधून मतदान केंद्रातून बाहेर आले तेव्हा त्यांना काही तरुणांनी घेरले. तसेच त्यांना लाठ्याकाठ्या घेऊन मारहाण केली. या प्रकरणी आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपासस करत आहेत.

महमूदपूर गावातील रहिवासी असलेले मदन लाल हे गृहस्थ त्यांच्या चार वर्षांच्या नातवासोबत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेले होते. मदन लाल हे मतदान करून बाहेर आले तेव्हा तिथे उभ्या असलेल्या काही तरुणांनी त्यांना मत कुणाला दिलं? असं विचारलं, तेव्हा मदन लाल यांच्या नातवाने काँग्रेसचं नाव घेतलं. काँग्रेसचं नाव घेताच बाहेर उभ्या असलेल्या तरुणांनी मदनलाल यांना लाठ्याकाठ्या घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी झालेल्या मदनलाल यांना उपचारांसांठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्यांना अधिक उपचारांसाठी खानपूर महिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  

दरम्यान, मारहाण झालेले मदन लाल यांनी सांगितले की, मारहाण करणारे तरुण गावातीलच रहिवासी होते. मी त्यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे. माझ्यासोबत माझा नातू होता. तो केवळ ४ वर्षांचा आहे. त्याला मतदान काय असतं ते माहिती नाही. गावातील कमल नावाच्या तरुणाने मारहाण केली. त्याच्यासोबत काही लोक होते.  मात्र मारहाण केवळ कमल नावाच्या तरुणानेच केली. दरम्यान, हरियाणामधील इतर काही भागातही हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानCrime Newsगुन्हेगारी