शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

हर हर गंगे... प्रयागराजमध्ये स्मृती इराणींचे शाही स्नान, डुबकी घेतल्याचा फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 12:07 PM

आखाडा परिषदेच्या शिरस्त्याप्रमाणे व परंपरेनुसार पहाटे 5.15 वाजता महानिर्वाणी व अटल आखाड्याने संगमाकडे प्रस्थान ठेवले.

प्रयागराज : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आजपासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. त्रिशूळ, गदा, तलवारी नाचवत व डमरू वाजवत कुंभमेळ्यातील मकर संक्रांतीच्या पहिल्या शाही स्नानासाठी संत महंतांच्या शोभा यात्रांना प्रारंभ झाला. कडाक्याच्या थंडीत धार्मिक आस्थेची उब उरी बाळगणारे लाखो भक्त पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमावर पोहोचले आहेत. त्यातच, केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही गंगा स्नान केले. गंगा नदीत डुबकी घेऊन इराणी यांनीही शाही स्नान केले. 

आखाडा परिषदेच्या शिरस्त्याप्रमाणे व परंपरेनुसार पहाटे 5.15 वाजता महानिर्वाणी व अटल आखाड्याने संगमाकडे प्रस्थान ठेवले तर 5.45 वाजता निरंजनी व आनंद आखाड्याची शोभायात्रा प्रारंभ झाली आहे. महानिर्वाणीचे आचार्य विश्वत्मानंद सरस्वती, स्वामी वासुदेवानंद सरस्वती आदी महामंडलेश्वर रथावर आहेत. तर, महंतांसह, अनेक दिग्गज आणि भाविक भक्तही गंगा स्नानाचा लाभ घेत आहेत. केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनीही प्रयागराज येथे जाऊन पवित्र गंगास्नानाचा लाभ घेतला. स्मृती यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गंगा स्नानाचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबतच, हर हर गंगे.. असेही त्यांनी लिहिले आहे. 

निरंजनीचे महंत नरेंद्र गिरी, आनंद पिठाधिश्वर स्वामी बालकानंद गिरी व त्यांच्या पाठीमागे सोमेश्वरानंद गिरी, परमानंद गिरी, कालच महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक झालेल्या केंद्रीय राज्यमंत्री निरंजना ज्योती, विष्णुचैतन्य गिरी, गुरू माँ आनंदमयी, विद्यानंद गिरी, महेशानंद गिरी, सत्यानंद गिरी आदींचे फुलांनी सुसजजीत रथ आहेत. आखड्यांच्या इष्ट देवतांच्या पालख्या व धर्मध्वज अग्रभागी आहेत.   गा, यमुना व सरस्वतीच्या संगमावर कुंभ स्नान होत असून स्नानास जाणाऱ्या संत महंतांचं दर्शन व आशिर्वादासाठी रस्त्याच्या दुतर्फा भक्तांची मोठी गर्दी झाली आहे. कुंभासाठी सोडलेल्या खास रेल्वे, एसटी व खासगी वाहनांद्वारे लाखो भाविक प्रयागराजला पोहोचत आहेत. संगमाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर कालपासूनच वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येऊन वाहनं शहराबाहेर रोखली गेल्याने भाविकांना सुमारे 10 ते 12 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून संगम तटावर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ड्रोन कमेऱ्याद्वारे शाही मिरवणूक मार्गावर नजर ठेवली जात आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत विविध आखड्यांचं शाही स्नान चालणार आहे. शैव पंथीयांचे 10 तर वैष्णवांचे 3 असे एकूण 13 आखाडे व त्यांच्या अंतर्गत असलेले खालसे यात सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीUttar Pradeshउत्तर प्रदेशKumbh Melaकुंभ मेळाriverनदी