उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोतवाली परिसरातील रेल्वे रोडवर असलेल्या 'इंडियन बँक'मध्ये एका वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. अशफाक असं या ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचं नाव असून ते आपली पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या कॅश काउंटरवर उभे होते. त्याच वेळी त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना बँकेतील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हापूड नगरपालिकेतून निवृत्त झालेले अशफाक हे आपली पेन्शन काढण्यासाठी बँकेत गेले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कॅश काउंटरवर पैसे हातात येण्यापूर्वीच त्यांना अचानक हार्ट अटॅक आला. यामुळे ते खाली कोसळले. काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.
बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना स्पष्टपणे दिसत आहे. अशफाक शांतपणे उभे असताना अचानक कोसळतात. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अचानक वाढणाऱ्या हार्ट अटॅकच्या प्रकरणांनी पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. अशफाक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील झांसीमध्येही घडली होती. एका लग्न समारंभासाठी आलेले ६२ वर्षीय हरिमोहन सेन यांचा स्टेजवर जात असतानाच हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. तसेच अनेकांना खेळताना, जिममध्ये व्यायाम करताना, लग्न समारंभात नाचत असताना देखील हार्ट अटॅक आल्याचं समोर आलं आहे.
Web Summary : In Uttar Pradesh, a 65-year-old man, Ashfaq, died of a heart attack at a bank while waiting to collect his pension. The incident was captured on CCTV. He collapsed before receiving the money, highlighting rising heart attack concerns.
Web Summary : उत्तर प्रदेश के हापुड़ में पेंशन लेने बैंक पहुंचे 65 वर्षीय अशफाक की हार्ट अटैक से मौत हो गई। पैसे मिलने से पहले ही वे गिर पड़े। सीसीटीवी में कैद घटना से हार्ट अटैक के बढ़ते मामलों पर चिंता बढ़ गई है।