Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 03:03 PM2022-09-12T15:03:39+5:302022-09-12T15:05:05+5:30

जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्या खंडपीठाचा निर्णय

Gyanvapi mosque case hearing to continue as Varanasi court upholds maintainability of Hindu side petition The next hearing on September 22 | Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

Gyanvapi Case: ज्ञानवापी खटल्यात हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल, पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला

Next

Gyanvapi Case: वाराणसीतील ज्ञानवापी-श्रृंगार गौरी प्रकरणाचा निकाल देताना या प्रकरणातील हिंदू पक्षकारांची याचिका कोर्टात स्वीकारण्यात आली. ज्ञानवापी खटल्याचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश ए. के. विश्वेश यांच्या एक सदस्यीय खंडपीठाने हा खटला कायम ठेवण्यायोग्य असल्याचे मानले. यावेळी मुस्लीम बाजूची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आणि खटल्याची पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले.

हिंदू पक्षाचा दावा आहे की, १६व्या शतकात मुघल शासक औरंगजेबाने मंदिर तोडून मशीद बांधली होती. तर मुस्लीम बाजूचे म्हणणे आहे की तेथे आधीपासूनच मशीद होती, मंदिर पाडले गेलेले नाही. त्यानंतर ७.११ नियमान्वये झालेल्या चर्चेत दोन्ही बाजूंनी अनेक दावे मांडले. या प्रकरणात पूजा कायदा लागू होत नाही, असे हिंदू बाजूचे म्हणणे आहे. तर मुस्लीम पक्षाचे म्हणणे आहे की मशिदीला उपासना कायद्यांतर्गत संरक्षण असावे.

"आमच्या बाजूने निकाल न लागल्यास..." - मुस्लीम पक्षकार

ज्ञानवापीवरील निकालाबाबत मुस्लीम पक्षाचे वकील मोहम्मद तौहीद म्हणाले आहे की, निर्णय त्यांच्या बाजूने आला नाही तर उच्च न्यायालयाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत. आणि जर न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने आला नाही तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ.

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, "आज न्यायालयाने आमचे सर्व निर्णय मान्य केले आहेत. मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळण्यात आली आहे. पुढील सुनावणी २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. न्यायालयाने मुस्लिम पक्षाला उत्तर देण्यास सांगितले आहे. हिंदू पक्षाचे वकील सोहनलाल आर्य यांनी न्यायालयाबाहेर सांगितले की, प्रत्येक काशीवासींना शांतता राखण्याची विनंती केली जाते. हा निर्णय म्हणजे अत्यंत आनंदाची बाब असून संपूर्ण उत्तर प्रदेशात आनंदाचे वातावरण आहे. तर हिंदू पक्षाच्या याचिकाकर्त्या मंजू व्यास यांनी निकालानंतर सांगितले की, आज भारत आनंदी आहे. माझ्या हिंदू बंधू-भगिनींनी उत्सवासाठी दिवा लावावा.

Web Title: Gyanvapi mosque case hearing to continue as Varanasi court upholds maintainability of Hindu side petition The next hearing on September 22

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.