सर्वेक्षण, पूजेची परवानगी; ज्ञानवापीचा ऐतिहासिक दिला निकाल अन् न्यायाधीश झाले निवृत्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 10:52 AM2024-02-01T10:52:47+5:302024-02-01T10:54:10+5:30

Gyanvapi Case: न्यायालयीन सेवेच्या शेवटच्या दिवशी जिल्हा न्यायाधीशांनी ज्ञानवापीचा ऐतिहासिक निकाल दिला.

gyanvapi case district judge dr ajay krishna vishwesh gave decision last day of retirement name recorded | सर्वेक्षण, पूजेची परवानगी; ज्ञानवापीचा ऐतिहासिक दिला निकाल अन् न्यायाधीश झाले निवृत्त

सर्वेक्षण, पूजेची परवानगी; ज्ञानवापीचा ऐतिहासिक दिला निकाल अन् न्यायाधीश झाले निवृत्त

Gyanvapi Case: ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यास तळघरात हिंदूना पूजा करण्याचा अधिकार देण्याचा महत्त्वपूर्ण निकाल वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला. हिंदू पक्षाने न्याय मिळाल्याचे सांगत या निकालाचे स्वागत केले. वाराणसी जिल्हा न्यायालयाने निकाल दिल्यानंतर ज्ञानवापीमध्ये रात्री उशिरा पूजन करून दिवे प्रज्ज्वलित करण्यात आले. विशेष म्हणजे ज्ञानवापीचा ऐतिहासिक निकाल देताच जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश निवृत्त झाले.

नोव्हेंबर १९९३ पर्यंत तळघरात सोमनाथ व्यास तळघरात पूजापाठ करत होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने पुढे त्यावर बंदी घातली. तळघरात पूजेचा अधिकार मिळण्याबाबत शैलेंद्र पाठक यांनी २५ सप्टेंबर २०२३ रोजी याचिका दाखल केली होती. जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांनी याबाबत निकाल दिला. ज्ञानवापीचे संपूर्ण प्रकरण जिल्हा न्यायाधीश अजय कृष्ण विश्वेश यांच्याच कार्यकाळात सुनावणीस आले होते. 

सर्वोच्च न्यायाल्याच्या निर्देशानंतर शृंगार गौरी प्रकरण निकाली काढले

जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी २१ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हा न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. २० मे २०२२ रोजी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला होता की, शृंगार गौरीशी संबंधित खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीशांनी करावी. शृंगार गौरी प्रकरणाला विशेष पूजा स्थळ कायद्याचा अडथळा नाही, असे आदेश जिल्हा न्यायाधीशांनी दिले. शृंगार गौरी प्रकरणासह जिल्हा न्यायाधीशांनी इतर सात खटले त्यांच्या न्यायालयात वर्ग करत एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. २१ जुलै २०२३ रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला ज्ञानवापी संकुलात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. २५ जानेवारी रोजी पुरातत्त्व विभागाचा हा ८३९ पानांचा अहवाल जिल्हा न्यायालयाला प्राप्त झाला. न्यायालयीन सेवेच्या शेवटच्या दिवशी जिल्हा न्यायाधीशांनी ३० वर्षांनंतर पुन्हा ज्ञानवापी येथील व्यास तळघरात पूजेचा मार्ग मोकळा केला आहे.

दरम्यान, मूळचे हरिद्वार उत्तराखंडचे रहिवासी असलेले जिल्हा न्यायाधीश आपल्या कामाच्या बाबतीत इतके कडक होते की, न्यायालयात कोणाचा मोबाईल वाजला तर तो जप्त करायचे. जिल्हा न्यायाधीश डॉ.अजय कृष्ण विश्वेश यांची कार्यशैली विशेष होती. ते नेहमी हसतमुखाने सर्व प्रश्न सोडवत. तरुण वकिलांना काम शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन दिले. कधीही कोणाच्या दबावाखाली येऊन काम केले नाही.
 

Web Title: gyanvapi case district judge dr ajay krishna vishwesh gave decision last day of retirement name recorded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.