शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

खोट्या प्रतिष्ठेपायी बाप बनला हैवान, १८ वर्षांच्या मुलीची हत्या करून मृतदेह जाळला, ३३ दिवसांनी झाली उघड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:47 IST

Gurugram Honor Killing: हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात ऑनर किलींगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी १८ वर्षांच्या मुलीची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यात ऑनर किलींगची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नातेवाईकांनी १८ वर्षांच्या मुलीची हत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. तसेच आरोपींनी पीडितेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जाळल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळत असलेल्या माहितीनुसार ही घटना गुरुग्राममधी सोहना येथे घडली होती. खोट्या प्रतिष्ठेपायी एका १८ वर्षीय तरुणीला जिवे मारण्यात आले. आता या ऑनर किलिंग प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणीचे वडील, भाऊ आणि काका यांना अटक केली आहे. तर २ आरोपी फरार आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जानेवारी रोजी ही तरुणी क्लाससाठी निघाली होती. मात्र ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीचा तपास करत असताना पोलिसांनी ३३ दिवसांनंतर ऑनर किलिंगच्या धक्कादायक घटनेचा उलगडा केला. 

प्राथमिक तपासामध्ये ही तरुणी कुठल्या तरी मित्रासोबत ३१ जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर २ फेब्रुवारी रोजी या तरुणाच्या नातेवाईकांनी तरुण आणि तरुणीला परत बोलावले आणि त्या तरुणीला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवले.  मात्र तिने कुटुंबाची प्रतिष्ठा, मानमर्यादा धुळीस मिळवली असं वाटू लागल्याने वडील, भाऊ आणि काका यांनी ३ फेब्रुवारी रोजी या तरुणीची हत्या केली. 

३ फेब्रुवारी रोजी अगदी योजनाबद्ध पद्धतीने आरोपी बलबीर आणि त्याचा मोठा भाऊ तसेच इतरांनी मिळून या तरुणीला गाडीमध्ये बसवले. तिथे तिची गळा आवळून हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह आरवली पर्वतात नेऊन तिथे त्याचं दहन केलं. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.  

टॅग्स :Honor Killingऑनर किलिंगCrime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारHaryanaहरयाणा