शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्न; ९२२ मतांनी जिंकले विमल चुडासमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 06:30 IST

पाटीदारांनी ‘हात’ सोडला, गड ढासळला! काँग्रेसचे आमदार फोडल्याचा भाजपला फायदा

कमलेश वानखेडे 

राजकोट - २०१७च्या निवडणुकीत काँग्रेसला ५४ पैकी तब्बल ३० जागा जिंकून देणाऱ्या सौराष्ट्रनेच यावेळी काँग्रेसला निराश केले. गेल्या वेळच्या पाटीदार आंदोलनाची धार यावेळी बोथट झाली. बहुतांश पाटीदार नेते काँग्रेसचा ‘हात’ सोडत भाजपवासी झाले. एवढेच नव्हे तर डझनभराहून अधिक काँग्रेसचे आमदार ‘पक्षपलटू’ होत भाजपकडून लढले. दिल्लीतून काँग्रेस उमेदवारांना पाहिजे तसे पाठबळ मिळाले नाही. परिणामी गडातच काँग्रेसची चौफेर कोंडी झाली व दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. 

सोमनाथ काँग्रेसला तर द्वारकाधीश भाजपला प्रसन्नसौराष्ट्रमधील सोमनाथ व द्वारका काॅंग्रेस व भाजपचे बालेकिल्ले आहेत. ते त्या पक्षांनी कायम राखले. भाजपने सौराष्ट्र एकतर्फी जिंकले असले तरी सोमनाथ मात्र जिंकता आले नाही. येथे काँग्रेसचे विमाल चुडासमा फक्त ९२२ मतांनी जिंकले. गेल्या ३२ वर्षांपासून द्वारकेवर राज करणारे भाजपचे पबुभा माणेक यांना आठव्यांदा द्वारकाधीशाने उचलून धरले. महात्मा गांधींची जन्मभूमी असलेल्या पोरबंदरची जागा भाजपकडून खेचण्यात काँग्रेसला यश आले.

‘आप’ला सौराष्ट्रची साथ, पण...सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या आम आदमी पार्टीने सौराष्ट्रवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळेच द्वारकाच्या खंभालिया मतदारसंघातून रिंगणात असलेले इसुदान गढवी यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. मात्र, ‘आप’चे हे कार्ड येथे उलटे पडले. गढवी हे स्वत:लाही पराभवापासून वाचवू शकले नाहीत. ‘आप’ला  ५ जागा मिळाल्या त्यापैकी ४ जागा सौराष्ट्रने दिल्या आहेत. विसावदर, गरियाधर, जामजोधपूर व बोटाड या जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

राजकोट जिल्ह्यातील सर्व आठही जागा भाजपने जिंकल्या. काँग्रेसने आपल्या १८ आमदारांना पुन्हा तिकीट दिले होते. मात्र, त्यापैकी फक्त दोन आमदार जागा राखण्यात यशस्वी ठरले. भाजपने बहुतांश नवे चेहरे दिले. पण पक्ष संघटनेच्या बळावर ते विजयी झाले. 

सौराष्ट्रमधील चित्रपक्ष    २०१७    २०२२ भाजप    २३    ४६ काँग्रेस    ३०    ०३ इतर    ०१    ०१ आप     -    ०४

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022BJPभाजपाcongressकाँग्रेस