शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

सोन्याचे दागिने घालण्यास रोखत होता इंजिनीअर पती, पत्नीनं केलं FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 3:57 PM

गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अहमदाबादः गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेनं पोलीस ठाण्यात जाऊन घरगुती हिंसा आणि पती मानसिक छळ करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मला पती सोन्याचे दागिने घालू देत नसल्याचा तक्रारदार पत्नीचा आरोप आहे. त्यामुळे तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचंही तिनं सांगितलं आहे.तक्रारदार महिला एका प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये कामाला आहे. 35 वर्षांच्या या महिलेनं रविवारी अचानक पोलीस ठाणे गाठलं आणि तिनं पेशानं इंजिनीअर असलेल्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच मी सोने घालणार असल्याचं सांगितल्यावर तो धमकावत असल्याचाही पत्नीचा आरोप आहे. महिलेचं वय 35 वर्षं आहे. तर पतीचं वय 39 वर्षं असून, हे दाम्पत्य वस्त्रापूर भागात वास्तव्याला आहे.2016मध्ये आयटी इंजिनीअर पतीशी लग्न झाल्याचं तक्रारदार पत्नीनं सांगितलं आहे. त्यांना दोन वर्षांची एक मुलगीसुद्धा आहे. तक्रारदार महिलेनं सांगितलं की, एका नातेवाईकाकडे आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्तानं गेलो होतो. त्यानंतर घरी परतल्यावर आमच्यात कडाक्याचं भांडण झालं. त्याचदरम्यान पतीनं मला दुखापत करण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर काही दिवसांनीच आमच्यात खटके उडू लागले. त्या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण आणि हाणामारी होत होती. लग्नाच्या वेळी मला माहेरहून 20 तोळे सोनं मिळाले होते. परंतु लग्नानंतर पतीनं ते परिधान करू न दिल्याचं तिने सांगितलं आहे.