राजीनामा देण्याच्या ३ तास आधीच मोदींच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते रूपाणी, यामुळे गमवावी लागली खुर्ची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 09:57 PM2021-09-11T21:57:51+5:302021-09-11T21:58:22+5:30

CM Vijay Rupani Resigns : राजीनामा देण्यापूर्वी रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींसोबत एका कार्यक्रमाला हजेरीही लावली होती. पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबादमधील सरदारधाम भवनाचे उद्घाटन केले. यावेळी ते उपस्थित होते.

Gujarat why vijay rupani resigns from cm post here is the reasons  | राजीनामा देण्याच्या ३ तास आधीच मोदींच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते रूपाणी, यामुळे गमवावी लागली खुर्ची

राजीनामा देण्याच्या ३ तास आधीच मोदींच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते रूपाणी, यामुळे गमवावी लागली खुर्ची

Next

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता ते राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याच वेळी त्यांनी राजीनामाही दिला. यानंतर आता गुजरातमधील राजकीय हलचालींना वेग आला आहे. महत्वाचे म्हणजे, राजीनामा देण्यापूर्वी रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींसोबत एका कार्यक्रमाला हजेरीही लावली होती. पंतप्रधानांनी शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबादमधील सरदारधाम भवनाचे उद्घाटन केले. यावेळी ते उपस्थित होते. (Gujarat why vijay rupani resigns from cm post here is the reasons )

या कारणांमुळे द्यावा लागला राजीनामा - 
जानकारांच्या मते, विजय रुपाणी यांच्या राजीनाम्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोविड महामारी. कोरोनाच्या दोन्ही लाटांदरम्यान, मुख्यमंत्री आणि त्यांचे व्यवस्थापन कोरोनाचा सामना करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांना बऱ्याच वेळा कोरोनासंदर्भातील आपलेच निर्णयही मागे घ्यावे लागले. कोविड काळात झालेले लोकांचे मृत्यू आणि सरकारचे अयोग्य व्यवस्थापन यांमुळे राज्यातील लोकांमध्ये भाजप सरकारविरोधात रोषही वाढलेला होता. अशात, पक्षाने राज्यातील नेतृत्व बदलून लोकांचा रोषही शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला? लिहून आणलेलं उत्तर विजय रुपाणींनी वाचून दाखवलं, म्हणाले...

अधिकाऱ्यांसंदर्भात केंद्राकडे तक्रारी - 
विजय रुपाणी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अधिकारी वर्ग  वरचढ झाल्याच्या तक्रारी राज्य संघटना आणि अनेक आमदार सतत्याने केंद्राकडे करत होते. मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांवर पकड नाही, ते त्यांच्या मर्जीनेच निर्णय घेतात, एवढेच नाही तर ते आमदार आणि कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, असे असे त्यांचे म्हणणे होते. 

याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे, गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील आणि मुख्यमंत्री रूपाणी यांच्यात मतभेद असल्यासंदर्भातील बातम्याही येतच होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही, सत्ता आणि संघटना यांच्यात परस्पर समन्वय नसल्याचेही अनेक वेळा दिसून आले. यामुळेच, सीएम रुपाणी यांना बाजूला करून केंद्रीय नेतृत्व राज्याची कमान नव्या चेहऱ्याकडे सोपवू इच्छित अस्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

 

Web Title: Gujarat why vijay rupani resigns from cm post here is the reasons 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.