शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Gujarat Violence: गुजरातमध्ये पुन्हा उसळली दंगल; हिंमतनगरमध्ये घरांवर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:51 IST

Gujarat Violence: 10 एप्रिल रोजी झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले होते. मात्र, सोमवारी पुन्हा विशिष्ट समाजातील लोकांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक करण्यात आली.

हिंमतनगर: 10 एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी गुजरातमधील हिंमतनगर, खंभात आणि द्वारका या तीन जिल्ह्यांमध्ये दोन समुदायांमध्ये दंगल उसळली होती. दंगलीनंतर तिन्ही जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आली. मात्र, सोमवारी रात्री उशिरा हिंमतनगरमधील वंजारवास परिसरात पुन्हा दंगल उसळली. दंगलखोर इतर समाजातील लोकांच्या घरांना लक्ष्य करत आहेत.

यापूर्वी पोलिसांनी शांतता समितीची बैठक घेऊन दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही दंगलखोरांनी विशिष्ट समाजाच्या लोकांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब आणि दगडफेक केली, परिणामी डझनभर कुटुंबांना जीव वाचवण्यासाठी पलायन करावे लागले. यादरम्यान पीडितांना पोलिसांचीही मदत मिळत नाहीये.

सोमवारी रात्री बॉम्ब हल्ले पोलिसांनी त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्याचे वंजारवास परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. पण, सोमवारी रात्री उशिरा त्यांच्या वस्तीवर हल्ला झाला. घरांची तोडफोड करण्यात आली आणि सामानाचीही चोरी झाली. रात्री चंदनगर आणि हसननगर येथील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. दंगलखोरांनी त्यांच्या घरांवर पेट्रोल-बॉम्ब फेकले, त्यामुळे दोन घरेही जाळण्यात आली. पोलिस पथक पोहोचेपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते.

पोलिस बंदोबस्त असतानाही हल्ला हिंमतनगरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर गृहविभाग आणि पोलीस कामाला लागले. पोलीस, आरएएफ आणि एसआरपी तैनात करण्यात आले होते. परिस्थितीची पाहणी करुन दंगल रोखण्यासाठी सोमवारी सायंकाळी जिल्हा पोलिस प्रमुख व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठकही झाली. पण, शांतता समितीची बैठक होऊन पाच तास उलटले असताना रात्री उशिरा हिमतनगर येथील वंजारवास येथे हल्ला झाला.

गृहराज्यमंत्री घटनास्थळी पोहोचलेपरिसरात राहणारे राहुल सिंह राजपूत यांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास 50 कुटुंबे बस्ती सोडून गेली आहेत. स्थलांतराची माहिती मिळताच गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी वंजारवास गाठले आणि लोकांना त्यांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले. सध्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी हल्ला करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माध्यमांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 15 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातPoliceपोलिस