ट्रक-मॅजिकची धडक, 10 जणांचा जागीच मृत्यू; बावला-बगोदरा महामार्गावर भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 16:20 IST2023-08-11T16:19:56+5:302023-08-11T16:20:53+5:30
मृतांमध्ये पाच महिला, तीन मुली आणि दोन पुरुषांचा समावेश...

ट्रक-मॅजिकची धडक, 10 जणांचा जागीच मृत्यू; बावला-बगोदरा महामार्गावर भीषण अपघात
गुजरातमधील बावला-बगोदरा महामार्गावर एक भरधाव मिनी ट्रक दुसऱ्या ट्रकला धडकला. या भिषण अपघातात 10 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटना स्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मिनी ट्रकमधून मृतदेह काढला. यासंदर्भात अहमदाबाद ग्रामीण एसपींनी माहिती दिली.
माध्यमांतील वृत्तांनुसार, चोटिला मातेचे दर्शन करून परतणारा एक मॅजिक महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला. मृतांमध्ये पाच महिला, तीन मुली आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. घटनेची महिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात महामार्गावर ट्रक उभा असल्यामुळे झाल्याचे समजते.
मॅजिकमध्ये जवळपास 13 लोक बसलेले होते. हे सर्व लोक सुरेंद्र नगर जिल्ह्यातील चोटिलावरून परतत होते. याच दरम्यान महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मॅजिक धडला. अपघातानंतर बावला-बगोदरा महामार्ग जाम झाला होता, असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित ट्रक टायर पंक्चर झाल्याने महामार्गावर उभा होता, असे पोलिसांनी म्हटले आहे.