गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 19:12 IST2025-09-06T19:12:11+5:302025-09-06T19:12:52+5:30
महत्वाचे म्हणजे, या अपघातामुळे पावागड येथे सुरू असलेल्या विकासकामांवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.

गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
गुजरातमधील पंचमहल जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पावागड येथे शनिवारी (६ सप्टेंबर) एक भीषण अपघात झाला. येथे बांधकामाच्या कामासाठी वापरला जाणारा मालवाहू रोपवे कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. ही घटना दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
या रोपवेचा वापर मंची भागापासून निज मंदिरापर्यंत बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी केला जात होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून मदत आणि बचाव कार्य सुरू केले.
या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यांत 2 लिफ्ट ऑपरेटर, 2 कर्मचारी आणि 2 इतर लोकांचा समावेश आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलीस आणि अग्निशमन विभागाला तत्काळ माहिती देण्यात आली. यानंतर, दोन्ही विभागांचे पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह बाहेर काढण्याच्या कामाला सुरुवात केली.
महत्वाचे म्हणजे, या अपघातामुळे पावागड येथे सुरू असलेल्या विकासकामांवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
घटनेची चोकशी सुरू -
भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी अथवा तपास सुरू करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.