शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

घोड्यावरुन वरात काढल्यानं गावाचा दलितांवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 10:19 AM

गुजरातमधला धक्कादायक प्रकार

मेहसाणा: लग्नाची वरात घोड्यावरुन काढल्यानं ग्रामस्थांनी सर्व दलितांना बहिष्कृत केलं आहे. गुजरातच्या मेहसणामधल्या कडी इथल्या ल्होर गावात हा धक्कादायक प्रकार घडला. गावातल्या दलित कुटुंबाशी संबंध ठेवल्यास पाच हजारांचा दंड ठोठावण्याचा निर्णयदेखील ग्रामस्थांनी सरपंचांच्या मदतीनं घेतला.ल्होर गावातल्या मनुभाई परमार यांचा मुलगा मेहुलचा विवाह नुकताच संपन्न झाला. त्यावेळी घोड्यावरुन वरात काढण्यात आली. नाचत-गात काढण्यात आलेली ही वरात गावातल्या उच्चवर्णीयांना रुचली नाही. त्याच रात्री ग्रामस्थांनी एक बैठक घेतली. त्यात दलितांविरोधात अनेक निर्णय घेण्यात आले. गावातल्या दलितांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून गावातल्या दलितांना पाणी, दूध, भाज्या यासारख्या वस्तू देण्यात आल्या नाहीत. गावातल्या एखाद्या व्यक्तीनं दलितांसोबत संबंध ठेवल्यास त्याच्याकडून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी मनुभाई परमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सरपंचासह 4 जणांना अटक केली. तर सरपंचाचा मुलगा अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर दलितांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यास सुरुवात झाली.  

टॅग्स :Gujaratगुजरात