शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला मोठा धक्का, आमदार केतन इनामदार यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 14:31 IST

Gujarat BJP MLA Ketan Inamdar Resigns : काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्या आणि पदांमुळे केतन इनामदार नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Gujarat BJP MLA Ketan Inamdar Resigns : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. वडोदरा जिल्ह्यातील सावली मतदारसंघातील भाजपाचे आमदार केतन इनामदार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, केतन इनामदार हे भाजपावर नाराज आहेत. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या नेत्यांना मिळणाऱ्या जबाबदाऱ्या आणि पदांमुळे केतन इनामदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा सुद्धा समोर येत आहे. 

केतन इनामदार यांनी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांना ईमेल पाठवून राजीनामा दिला आहे. केतन इनामदार यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, माझ्या अंतरात्म्याच्या आवाजाचा मान राखत मी आमदार पदाचा राजीनामा देत आहे. दरम्यान, 2012 मध्ये केतन इनामदार यांनी अपक्ष म्हणून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2017 आणि 2022 मध्ये ते भाजपाच्या तिकिटावर आमदार झाले. वडोदरा जिल्हा पंचायत सदस्य म्हणून केतन इनामदार यांनी राजकारणाला सुरुवात केली. त्यांची सहकार क्षेत्रात पकड आहे. बडोदा डेअरीच्या प्रश्नावरही त्यांनी आवाज उठवला होता. 

काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने केतन इनामदार नाराज असल्याचे म्हटले जात आहे. सतीश पटेल यांना जिल्हाध्यक्ष केल्यामुळे केतन इनामदार नाराज असल्याचे म्हटले जाते. यापूर्वीही केतन इनामदार यांनी जानेवारी 2020 मध्ये आमदारपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती, मात्र त्यावेळी विधानसभा अध्यक्ष्यांनी तो स्वीकारला नव्हता. तेव्हा केतन इनामदार यांनी असा दावा केला होता की, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि मंत्री त्यांच्याकडे आणि त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष करत आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४gujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा