गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 02:22 AM2020-06-09T02:22:00+5:302020-06-09T02:22:07+5:30

पर्यायी अभ्यासात सहभागी झाले ३०० बीट गार्ड : निष्कर्ष मात्र होणार नाही जाहीर; पाच वर्षांतून एकदा होते सिंहांची गणना

'Guess study' due to avoidance of lion census in Gir sanctuary | गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

गीर अभयारण्यात सिंहगणना टळल्यामुळे ‘अंदाज अभ्यास’

googlenewsNext

अहमदाबाद : जगप्रसिद्ध गीर वन्यजीव अभयारण्यात दर पाच वर्षांनी होणारी सिंहांची शिरगणती कोरोना साथीमुळे टळली असून, त्याऐवजी सिंहांच्या संख्येबाबतचा ‘अंदाज अभ्यास’ वन विभागाने केला आहे. यात थेट गणना न करता काही ठोकताळ्यांनुसार सिंहांची संख्या ठरविण्यात आली. एका वरिष्ठ वन अधिकाऱ्याने सांगितले की, ५ व ६ जूनच्या मधल्या रात्री पौर्णिमेला अंदाज अभ्यास करण्यात आला. यात सिंहांच्या संख्येबाबत अंदाज बांधण्यात आला. हा आकडा जाहीर मात्र केला जाणार नाही.

यंदा मे महिन्यात पंचवार्षिक सिंह गणना होणार होती. त्यासाठी मोठी तयारीही करण्यात आली होती. तथापि, त्याआधीच कोरोना विषाणूची साथ पसरल्यामुळे ही गणना प्रक्रिया रद्द करण्यात आली. याआधीची सिंह गणना २०१५ मध्ये झाली होती. गीरमध्ये ५२३ सिंह त्यावेळी आढळले होते. गीर हे आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान राहिले आहे.
गुजरातचे प्रधान वन संरक्षक श्यामल टीकादार यांनी सांगितले की, सिंहांबाबतचा अंदाज अभ्यास हा औपचारिक अथवा अनौपचारिक गणना नाही. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात सिंहांवर नजर ठेवून त्यांच्या संख्येचा अंदाज बांधायला सांगितले. हे एक नेहमीचेच काम आहे. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री आम्ही ही प्रक्रिया राबवीत असतो.
या अभ्यासातील निष्कर्ष सामायिक करण्यास टीकादार यांनी नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासात ३०० बीट गार्ड सहभागी झाले. गीर अभयारण्याच्या परिसरातील गावांच्या सरपंचांनाही यात सहभागी करून घेण्यात आले होते. जुनागड वनवृत्ताचे मुख्य वन संरक्षक डी.टी. वासवदा यांनी सांगितले की, अंदाज अभ्यास शनिवारी पूर्ण करण्यात आला. यातून समोर आलेली आकडेवारी जाहीर करायची की नाही, ही धोरणात्मक बाब असून, याचा निर्णय राज्य सरकारच घेऊ शकते. लॉकडाऊनमुळे यंदा परिपूर्ण सिंह गणना करणे शक्य झाले नाही. वासवदा यांनी सांगितले की, दर पाच वर्षांनी होणारी सिंह गणना एक व्यापक प्रक्रिया असते. राष्ट्रीय वन्यजीवन महामंडळाचे सदस्य त्यात सहभागी असतात. केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, जंगलप्रेमी आणि स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होत असतात. लॉनडाऊन असल्यामुळे या सर्वांना आम्ही बोलावू शकलो नाही.

गणनेसाठी उन्हाळा आदर्श

च्एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, सिंहांच्या गणनेसाठी उन्हाळा हा आदर्श काळ असतो. त्यानंतर येणारा पावसाळा हा सिंहांचा फलन काळ असतो. पावसाळ्याचे संपूर्ण चार महिने अभयारण्य बंद असते. हिवाळाही गणनेसाठी योग्य नसतो.
च्आता टळलेली सिंह गणना कधी केली जाईल, या प्रश्नावर वासवदा यांनी सांगितले की, आता यंदा गणनाच केली जाणार नाही. ती पुढे ढकलण्यात आली आहे. पुढची तारीख आता सरकारच ठरवू शकते. वन्यजीव प्रेमी आणि कार्यकर्ते सिंह गणनेची वाट पाहत होते.

आजारांचे संकट
च्एका अधिकाºयाने सांगितले की, दोन वर्षांपासून गीरच्या सिंहांवर विविध आजारांची संकटे येताना दिसून येत आहेत. मागील तीन महिन्यांपासून गीर अभयारण्यात बेबेसियॉसिस या आजाराने सुमारे दोन डझन सिंह मरण पावले आहेत.

च्बेबेसिया नावाच्या एका परजीवीमुळे हा आजार होतो. त्याची लक्षणे मलेरियासारखी असतात. तत्पूर्वी, आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१८ मध्येही कॅनाईन डिस्टेंपर विषाणूमुळे गीरमध्ये सुमारे ४० सिंह मरण पावले होते.

जुनागढच्या नबाबाने घातली होती शिकारीवर बंदी
च्गुजरातने गीरच्या जंगलात सिंहांच्या संरक्षणात मोठे यश मिळविले आहे. हा परिसर स्वातंत्र्यपूर्व काळात जुनागढ संस्थानच्या अखत्यारीत होता. जुनागढचा नवाब महाबत खान याने सिंहांच्या शिकारीवर प्रतिबंध घातला होता.
च्गीर अभयारण्यातील सिंह अनेक वेळा शेजारील जिल्ह्यांतील शेतात येतात. अभयारण्य परिसरात असलेल्या शहरांत आणि मानवी वस्त्यांतही सिंह घुसण्याच्या घटना घडतात.

Web Title: 'Guess study' due to avoidance of lion census in Gir sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.