कठीण स्थितीत जीएसटी ठरेल महत्त्वाचे -असोचेम

By Admin | Updated: November 26, 2015 22:16 IST2015-11-26T22:16:48+5:302015-11-26T22:16:48+5:30

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले असतानाच उद्योग मंडळ असोचेमने विरोधी पक्षांना आवाहन केले आहे की, त्यांनी जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर विधेयक मंजुरीसाठी सहकार्य करावे

GST will be crucial in tough conditions - Ascham | कठीण स्थितीत जीएसटी ठरेल महत्त्वाचे -असोचेम

कठीण स्थितीत जीएसटी ठरेल महत्त्वाचे -असोचेम

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले असतानाच उद्योग मंडळ असोचेमने विरोधी पक्षांना आवाहन केले आहे की, त्यांनी जीएसटी अर्थात वस्तू व सेवाकर विधेयक मंजुरीसाठी सहकार्य करावे. सध्याच्या कठीण परिस्थितीत कदाचित हे ब्रह्मास्त्र ठरू शकते, असा आशावादही असोचेमने व्यक्त केला आहे.
असोचेमचे नवे अध्यक्ष सुनील कनोरिया यांनी सांगितले की, सकल घरेलु उत्पादन (जीडीपी) वृद्धीसाठी जीएसटी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सर्व पक्षांनी एकत्र येऊन आता उशीर न करता हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
हे विधेयक मंजूर झाले तर जगभरात एक सकारात्मक संदेश जाईल की, गंभीर आर्थिक संकटातही राजकीय इच्छाशक्तीमुळे भारतीय अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकते. कनोरिया म्हणाले की, पॅरिस हल्ल्यानंतर राजकीय परिस्थिती अनिश्चित झाली आहे. दुसरीकडे जागतिक स्तरावर वस्तूंच्या किमती घसरत आहेत.

Web Title: GST will be crucial in tough conditions - Ascham