इकडे नवरा मुलगा लग्नाच्या तयारीत, तिकडे मुलगी 6 मुलांच्या बापासोबत गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 14:56 IST2023-03-17T14:55:59+5:302023-03-17T14:56:20+5:30

लग्नापूर्वीच कुटुंबीयांना धक्का; पोलिस ठाण्याच्या फेऱ्या सुरू.

groom was preparing for marriage, bride ran away with her boyfriend | इकडे नवरा मुलगा लग्नाच्या तयारीत, तिकडे मुलगी 6 मुलांच्या बापासोबत गेली पळून

इकडे नवरा मुलगा लग्नाच्या तयारीत, तिकडे मुलगी 6 मुलांच्या बापासोबत गेली पळून


रीवा: लग्न म्हणलं की, घरात कामाची खूप लगबग सुरू असते. एकीकडे मुलीच्या घरी मुलाच्या स्वागताची तयारी सुरू असते तर दुसरीकडे मुलाच्या घरी मुलीकडे वरात घेऊन जाण्याची तयारी सुरू असते. लग्नानंतर आपल्या नववधूला घरी आणण्यासाठी मुलाच्या घरचे खूप उत्साहात असतात, पण कधी-कधी त्यांच्या या उत्साहावर पाणी फेरले जाते. अशीच एक घटना रीवा शहरात घडली आहे. 

नवरा मुलगा आपल्या लग्नाची जय्यत तयारी करत होता, पण त्याच्या कानावर अशी एक बातमी पडली, जी ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. लग्नाआधीच त्याची होणारी बायको प्रियकर असलेल्या 6 मुलांच्या बापासोबत पळून गेली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी वधू-वरांच्या नातेवाइकांनी पोलिस ठाणे गाठले. नातेवाइकांचे म्हणणे आहे की, 15 फेब्रुवारी रोजी मुलगी तिचा लग्नातला ड्रेस घेण्यासाठी ड्राय क्लीनच्या दुकानात गेली होती, मात्र सायंकाळपर्यंत ती परतली नाही. 

या घटनेनंतर एकीकडे मुलाच्या घरी निराशेचे वातावरण आहे, तर दुसरीकडे मुलीचे कुटुंबीय पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत. तो व्यक्ती मुलीला घेऊन पळून गेला आहे, त्याची पत्नी आणि मुलेही पोलिस ठाण्याच्या फेऱ्या मारत आहेत. मात्र आजतागायत त्या दोघांचाही शोध लागलेला नाही. इर्शाद मन्सुरी असे त्या व्यक्यीचे नाव असून, त्याचा आणि तरुणीचा धर्म वेगळा आहे. सध्या या प्रकरणाची शहरात खूप चर्चा होत आहे.

Web Title: groom was preparing for marriage, bride ran away with her boyfriend