नवरदेव वरात घेऊन आला पण नवरीसह सासऱ्यामंडळींचा पत्ताच नाही; लग्नाआधी घडलं असं काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 11:44 IST2024-07-14T14:49:42+5:302024-07-15T11:44:45+5:30
उन्नावमधून वरात घेऊन आलेला नवरदेव रात्रभर नवरीच्या कुटुंबीयांना शोधत होता. पण त्याला नवरी आणि सासरची मंडळी सापडलीच नाहीत.

नवरदेव वरात घेऊन आला पण नवरीसह सासऱ्यामंडळींचा पत्ताच नाही; लग्नाआधी घडलं असं काही...
लखनौमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्नावमधून वरात घेऊन आलेला नवरदेव रात्रभर नवरीच्या कुटुंबीयांना शोधत होता. पण त्याला नवरी आणि सासरची मंडळी सापडलीच नाहीत. अशा परिस्थितीत अखेर नवरदेवाने पोलीस स्टेशन गाठलं आणि याबाबत तक्रार केली आहे. पोलीस आता वधू आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्नावच्या दलेलपूर येथे राहणाऱ्या सोनूची चार वर्षांपूर्वी चंदिगडमध्ये काजल नावाच्या मुलीशी ओळख झाली होती. काजलने तिचे घर लखनौच्या रहिमाबाद हसिमपूर गावात असल्याचं सांगितलं होतं. हळूहळू त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
दोघं एकमेकांशी बोलू लागले. याच दरम्यान दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही वेळापूर्वी काजलचे वडील शीशपाल यांच्याशी बोलणं झालं असलं तरी ही चर्चा फोनवरच झाली. यावेळी फोनवरच ११ जुलै रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.
सोनूने दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै रोजी रात्री काजलशी बोलले होते. लग्नाची तयारी पूर्ण झाली असून नातेवाईक घरी आल्याचं तिने सांगितलं. लग्नाआधी अनेक कार्यक्रम होणार आहेत. आता लग्नाच्या वरातीत फोनवर बोलणे शक्य होणार नाही. यानंतर फोन बंद झाला. लग्नाची वरात घेऊन नवरदेव लखनौ रहिमाबादला पोहोचताच वधूचा मोबाईल बंद असल्याचं समजलं.
या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सहआयुक्त आकाश कुलहरी यांनी सांगितलं. अशा लोकांचा शोध सुरू आहे ज्यांनी नवरदेवाला लग्नाची वरात घेऊन येण्यास सांगितलं आणि नंतर त्याच्या कुटुंबासह गायब झाले. नवरीने दिलेल्या पत्त्यावर ते सापडले नाहीत.