up groom nagin dance in lakhimpur kheri girl divorced | काय सांगता? नवरदेवाचा नागीण डान्स पाहून नवरीने केलं असं काही...

काय सांगता? नवरदेवाचा नागीण डान्स पाहून नवरीने केलं असं काही...

ठळक मुद्देनागीण डान्स करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये नवरदेवाचा डान्स पाहून नवरीने लग्नच मोडलं आहे.नवरदेवाने दारूच्या नशेत लग्न मंडपात स्टेजवर नागीण डान्स करायला सुरुवात केली.

बरेली - लग्नसोहळ्यात डान्स केला जातो. काही जणांचा नागीण डान्स हा विशेष लक्ष वेधून घेत असतो. मात्र नागीण डान्स करणं एका नवरदेवाला चांगलंच महागात पडलं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये नवरदेवाचा डान्स पाहून नवरीने लग्नच मोडलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखीमपूरच्या खिरी जिल्ह्यातील मेलानीमध्ये ही घटना घडली आहे. वरमाला गळ्यात पडल्यानंतर आनंदाच्या भरात नवरदेवाने स्टेजवरच नागीण डान्स केला. मात्र त्याचा हा डान्स नवरीला काही आवडला नाही आणि तिने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळेच संसार सुरू होण्याआधीच मोडला असल्याचं समोर आलं आहे.  

नवरदेवाने दारूच्या नशेत लग्न मंडपात स्टेजवर नागीण डान्स करायला सुरुवात केली. त्यावरून नाराज झालेल्या नवरीने लग्न मोडल्याचं सांगितलं. यामुळे लग्न सोहळ्यात एकच गोंधळ झाला. मुलीने नकार दिल्यावर संतापलेल्या नवऱ्याने नवरीच्या कानशिलाच लगावल्याची माहिती मिळत आहे. गोंधळ झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नवरदेवाने त्याला दिलेल्या भेटवस्तू परत केल्याने दोन्ही कुटुंबीयांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र उत्तर प्रदेशातील या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

खिरी जिल्ह्यातील मेलानीमध्ये नवरदेव लग्नसाठी मंगल कार्यालयात आला. त्याचवेळी त्याचे मित्र नाचू लागले. त्यांच्यासोबत नवरदेवही नाचत होता. वधूपक्षाला सर्वांसमोरचं त्याचं वागण फारस आवडलं नाही. यावरून त्यांच्यामध्ये वादही झाला. पण यातून मार्ग काढण्यात आला आणि हे प्रकरण मिटले. नवरा-नवरीने एकमेकांना वरमाला घातल्या. मात्र त्यानंतर काहीवेळाने आनंदाच्या भरात नवरदेवाने स्टेजवर पुन्हा एकदा नागीण डान्स करायला सुरुवात केली. मात्र त्याचा हा विचित्र डान्स न आवडल्याने नवरीने लग्न मोडल्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पती-पत्नीमध्ये काही कौटुंबिक कारणांवरून वाद झाल्याच्या घटना या समोर येत असतात. पण त्यातील काही भांडणं ही काही वेळेस विकोपाला ही जातात. अशीच एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशच्या गोरखपूर जिल्हात घडली आहे. पत्नीला खाण्यासाठी अंडं न देणं एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे. पती घरामध्ये खाण्यासाठी अंडी देत नाही म्हणून पत्नी घर सोडून प्रियकरासोबत पळाल्याची घटना समोर आली होती. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ही घटना घडली होती. काही दिवसांपूर्वी पत्नीसाठी गिफ्ट न आणणं एका पतीला चांगलंच महागात पडलं होतं. करवा चौथला पत्नीने सोन्याची नथ आणायला सांगितली होती. मात्र फक्त साडी घेऊन पती पोहचल्याने तिचा पारा चांगलाच चढला. गिफ्ट न आणल्याने रागाच्या भरात पतीला पळवून पळवून मारल्याची घटना समोर आली होती. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: up groom nagin dance in lakhimpur kheri girl divorced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.