govt allows invalid pension for soldiers with less than 10 years of service | देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

देशासाठी 10 वर्षांहून कमी काळ सेवा देणार्‍या जवानांनाही मिळणार पेन्शन; मोदी सरकारचं मोठं गिफ्ट

नवी दिल्ली- केंद्रातल्या मोदी सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीत सेवा बजावणा-या सशस्त्र दलातील जवानांना पेन्शन देण्यात परवानगी दिली आहे. खरं तर 10 वर्षांपेक्षा कमी काळ सेवा देणारे पेन्शनसाठी पात्र नसतात. पण मोदी सरकारनं या नियमांत बदल करून जवानांना दिलासा दिला आहे. मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, सरकारनं आतापर्यंत 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या जवानांना पेन्शनचा लाभ देत आहे, ज्यांना काही कारणास्तव पुढील लष्करी सेवा बजावता आलेली नाही.

मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले की, सरकारने सशस्त्र दलात दहा वर्षांपेक्षा कमी काळ सेवा बजावलेल्या जवानांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांना जखमी किंवा मानसिक अशक्तपणामुळे मुदतवाढ देण्यात आली नाही. अशा जवानांनाही या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. संरक्षण मंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या निर्णयाचा फायदा 4 जानेवारी 2019 रोजी किंवा नंतर सेवेत असलेले सर्व जवानांना होणार आहे. 
वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, जवानांना पेन्शन देण्याच्या प्रस्तावाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मान्यता दिली आहे. आतापर्यंत, ज्या कर्मचा-यांनी 10 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा केली, त्यांना पेन्शन देण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा 04 जानेवारी 2020 रोजी किंवा नंतर सेवेत असलेल्या सैनिकांना होईल. तत्पूर्वी जवानांना पेन्शनसाठी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा बजावण्याची अट आवश्यक होती. 10 वर्षांपेक्षा कमी सेवा बजावलेल्या जवानांना ग्रॅच्युइटी दिली गेली आहे.

पेन्शन कोणाला मिळणार आणि केव्हा?
जे जवान कर्तव्य बजावताना जखमी होतात आणि त्यांना अपंगत्व येते, त्यांना ही पेन्शन दिली जाणार आहे. कारण त्या जवानाला पुन्हा सेवेत घेता येत नाही. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सेवा बजावताना अपंग झालेल्या जवानांना ही पेन्शन दिली जाते.

आधी काय नियम होता
आतापर्यंत ज्या जवानांनी 10 वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा दिली आहे, अशा जवानांना ही पेन्शन देण्याचा नियम होता. पण आता सरकारने त्यासंदर्भातील नियमात बदल केला आहे. अपंगत्वामुळे सेवेच्या बाहेर फेकल्या गेलेल्या जवानांना आता ही पेन्शन दिली जाणार आहे

सैन्यात काम करणा-या कर्मचाऱ्यांसाठी सरकारची नवी आरोग्य योजना
मोदी सरकार जवान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. नुकतीच संरक्षण मंत्रालयाने माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी माजी सैनिकांच्या आरोग्य योजना (ईसीएचएस)ची घोषणा केली, त्या योजनेअंतर्गत 25 वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाचे माजी जवानांच्या अविवाहित व अपंग मुले यांना लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत कोरोना कुटुंबातील पीडित रुग्णाला ऑक्सिजन देण्याचा खर्चही उचलण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! 'या' बँकांनी मिनिमम बॅलन्स अन् व्यवहाराचे नियम बदलले, जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

ट्विटर हॅकर्स मागणी करणारे क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन म्हणजे नेमकं काय?

गुगलसोबत मिळून स्मार्टफोन बनवणार, मुकेश अंबानींची मोठी घोषणा

RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणतात, येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात होऊ शकते मोठी वाढ

CoronaVirus:लढ्याला यश! देशात Covaxinनंतर कोरोनावरच्या दुसऱ्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरू

अवघ्या 1000 रुपयांपासून भारत बॉन्ड्समध्ये गुंतवणूक करा अन् निश्चित फायदा मिळवा

चीनसोबतच्या संघर्षातही अमेरिका तैवानला देणार घातक PSC 3 क्षेपणास्त्र प्रणाली; जिनपिंग भडकले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: govt allows invalid pension for soldiers with less than 10 years of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.