जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 08:34 AM2020-07-16T08:34:25+5:302020-07-16T08:49:45+5:30

जेव्हा नेमकं हे कसं झालं हे कळेल, तेव्हा नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू, असंही जॅक डोर्सी म्हणाले आहेत. 

twitter we all feel terrible this happened says jack dorsey twitter ceo | जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

जगभरातल्या दिग्गजांचे ट्विटर अकाऊंट हॅक, CEO जॅक डोर्सी म्हणतात.... 

Next

ओबामा, नेत्यान्याहूंसह जो बिडेन, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या कालावधीत हॅकर्सनी एक लाखांहून अधिक डॉलर्स कमावले आहेत. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जॅक डोर्सी यांनी एक निवेदन जारी केले की, आमच्यासाठी एक कठीण दिवस आहे. जे काही घडले ते खरोखरच भयानक आहे. याचं समाधान आम्ही शोधणार असून, त्यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करणार आहोत. जेव्हा नेमकं हे कसं झालं हे कळेल, तेव्हा नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवू, असंही जॅक डोर्सी म्हणाले आहेत.

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क, अमेरिकेचे रॅपर कान्ये वेस्ट, अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, इस्त्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू, वॉरेन बफे, ऍपल, उबरसह अन्य ट्विटर खाती हॅक करण्यात आली आहेत. 

ट्विटर पोस्टमध्ये बिटकॉइनच्या माध्यमातून मागितले पैसे 
बिल गेट्सच्या खात्यातून ट्विट केले की, 'प्रत्येक जण मला परत येण्यास सांगत आहे, आता ती वेळ आली आहे. तुम्ही मला BTC पत्त्यावर एक हजार डॉलर्स पाठवा आणि मी तुम्हाला दोन हजार डॉलर्स करून देईन. ही ऑफर केवळ 30 मिनिटांसाठी उपलब्ध आहे. अशी पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्ये ही ट्वीट अकाऊंटवरून हटवण्यात आली. या दिग्गज व्यक्तींच्या अकाऊंटवर हा मेसेज कोणी केला याबाबत अद्याप समजलेलं नाही. टेस्ला प्रमुख एलॉन मस्क यांचं खातं हॅक करून पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मला बिटकॉइन्स द्या आणि मी तुम्हाला ते दुप्पट करून देईन. पुढच्या एका तासासाठी ही ऑफर आहे. बिटकॉइन पत्त्याच्या लिंकसह ट्विट केले आहे. कोरोना महारोगराईमुळे मी दान करत आहे. 

ही ट्विट काही मिनिटांत हटवण्यात आली
अमेरिकेचे प्रसिद्ध रॅपर कान्ये वेस्ट यांच्या व्यतिरिक्त माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन, जगातील सर्वात मोठी कंपन्या उबर आणि ऍपल यांची खातीही हॅक करण्यात आली. अल्पावधीतच शेकडो लोकांनी हॅकर्सना दहा लाखांहून अधिक डॉलर्स पाठविले. ज्या खात्यास लक्ष्य केले होते, त्या खात्यात लाखो अनुयायी आहेत. ट्विटरने म्हटले आहे की, ते घटनेचा तपास करीत आहेत आणि लवकरच याबाबतचे विधान प्रसिद्ध केले जाईल.

Read in English

Web Title: twitter we all feel terrible this happened says jack dorsey twitter ceo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.