शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील राजकीय संकटासाठी राज्यपाल आणि भाजप जबाबदार

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम

जदयू, मित्र पक्षांची एकजूट कायम
पाटणा : जितनराम मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २० फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करण्याआधी संयुक्त जनता दल आणि मित्र पक्षांनी आपल्या एकजूटतेचे प्रदर्शन करीत बिहारमधील राजकीय अस्थिरतेसाठी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. बिहारला संकट आणि राजकीय अस्थिरतेत ढकलण्यात आले आहे. राज्यपालांनी भाजपच्या निर्देशावरून मांझी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी जास्तीचा वेळ दिला आहे, असा आरोप जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी केला.
मुख्यमंत्री मांझी हे एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय घोषणा करीत असल्याने राज्यात अराजक आणि अस्थिरतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्याचा सरकारी तिजोरीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. आपण औटघटकेचे मुख्यमंत्री आहोत, हे ठाऊक असतानाही मांझी अनेक घोषणा करीत आहेत. राज्यपालांनी त्यांना अशा घोषणा करण्यापासून रोखले पाहिजे, असे सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)
-------
मांझी बहुमत सिद्ध करणारच -यादव
मांझी यांना जदयूच्या किमान ४० आमदारांचा पाठिंबा आहे आणि ते २० फेब्रुवारीलाआपले बहुमत सिद्ध करतील, असा दावा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचे बंधू आणि माजी खासदार अनिरुद्ध प्रसाद ऊर्फ साधू यादव यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले की, माजी मंत्री विजयकुमार चौधरी यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी करून नितीशकुमार यांनी एक प्रकारे आपला पराभव स्वीकार केला आहे आणि मांझी यांना मुख्यमंत्री मानलेले आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी आपल्याच पक्षाच्या चौधरी यांना पुढे केल्यामुळे नितीशकुमार यांनी आपल्याकडे बहुमत असल्याच्या दाव्याचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी जदयूचे बंडखोर आमदार रवींद्र राय हे साधू यादव यांच्या सोबत होते.