शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 05:43 IST

Government issues Census 2027 notification: केंद्र सरकारने १६व्या जनगणनेसाठी सोमवारी अधिसूचना जारी केली.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने १६व्या जनगणनेसाठी सोमवारी अधिसूचना जारी केली. त्यात जातनिहाय गणनेचाही समावेश आहे. जनगणना २०२६-२०२७ मध्ये होणार असून त्यासाठी १३ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नाव, लिंग, वय, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती, कुटुंब प्रमुखाशी असलेले नाते, शिक्षण, रोजगार, प्रवास आदी ३६ प्रकारचे प्रश्न नागरिकांना विचारले जाणार आहेत.

भारताची ही १६वी जनगणना तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही ८वी जनगणना आहे. संविधानाच्या अनुच्छेद २४६ अंतर्गत, जनगणना हा विषय केंद्राच्या यादीत ६९व्या क्रमांकावर आहे. समाजातील प्रत्येक घटकाची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया म्हणजे जनगणना होय. यावेळी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच जातींची नोंद मुख्य जनगणनेचा भाग म्हणून केली जाणार आहे. याआधी, ब्रिटिश कालखंडात १८८१ ते १९३१ दरम्यान समग्र जातीनिहाय गणना झाली होती. 

आकडेवारीचा उपयोग कशासाठी?- २०२८ च्या मतदारसंघ पुनर्रचनेसाठी.- २०२९ च्या लोकसभा निवडणुकीआधी आरक्षित जागांची स्थिती निश्चित करणे.- महिला आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार.

कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश?नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा? घरातील लोकांची संख्या किती? स्वतःचे घर आहे का? पक्के आहे की कच्चे? तुमची सामाजिक व आर्थिक माहिती? मोबाइल अ‍ॅप्स व स्व-गणनेचा पर्याय? मोबाइल, इंटरनेटचा वापर करता का? तुमच्याकडे कोणते वाहन आहे? पाणी नळाद्वारे येते की अन्य स्रोतांतून? महिला घरमालक आहे का? अनुसूचित जाती/जमातीचे आहात का? आणि धर्म, जात, उपजात विचारणार.

किती कर्मचारी सामील?देशाच्या १६ व्या जनगणेत एकूण १०० राष्ट्रीय प्रशिक्षक ४५,००० फील्ड प्रशिक्षक १,८०० मास्टर प्रशिक्षक I ३५ लाख एकूण कर्मचारी सहभागी होणार आहेत.

कधी सुरू होणार जनगणना?पहिला टप्पा : १ ऑक्टोबर २०२६ पासून - जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड या हिमालयीन प्रदेशांतदुसरा टप्पा : १ मार्च २०२७ पासून - उर्वरित भारतात

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारत