शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचं बक्षीस मिळवा; मोदी सरकारची जनतेला 'ऑफर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 16:11 IST

बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारनं एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत.  

नवी दिल्ली- बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारनं एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत.  प्राप्तिकर विभागानं बेहिशेबी मालमत्तेचा थांगपत्ता लावण्यासाठी 'बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना 2018'ला सुरुवात केली आहे.या योजनेंतर्गतही बेहिशेबी मालमत्तेची माहिती देणा-याला 1 कोटींचं बक्षीस मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं यासंदर्भात माहिती दिली आहे. बेनामी ट्रान्सफर सूचना रिवॉर्ड योजना 2018'अंतर्गत जॉइंट किंवा अॅडिशनल कमिश्नर प्राप्तिकर विभागाचे संचालक यांच्या अखत्यारीत येणा-या बेनामी मालमत्तेसंदर्भात माहिती देणा-यास 1 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.विशेष म्हणजे माहिती देणा-याचं नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. परंतु जर माहिती देणा-यानं चुकीची माहिती दिल्यास त्याला कोणतीही रक्कम मिळणार नाही. त्यासाठी प्राप्तिकर विभाग चौकशी करणार आहे. बेनामी मालमत्ता नियंत्रण कायदा, 1988अंतर्गत येणारी बेनामी मालमत्तेची माहिती देणा-यास हे बक्षीस मिळणार आहे. बेनामी मालमत्ता नियंत्रण कायदा, 1988या कायद्यात 2016मध्ये बदल करून तो आणखी कडक करण्यात आला आहे. बेनामी मालमत्ता म्हणजे काय ? 

  • बेनामी या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे. बेनामी म्हणजे नाव नसलेली मालमत्ता. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या नावाऐवजी दुस-याच्या नावावर मालमत्ता खरेदी करते, तेव्हा बेनामी मालमत्तेची निर्मिती होत असते. ज्याच्या नावावर मालमत्ता खरेदी केली गेली आहे त्या व्यक्तीस बेनामदार म्हटले जाते. 
  • बेनामदाराच्या नावावर मालमत्ता खरेदी केली असली तरी खरा मालक त्यासाठी पैसे खर्च करणारा किंवा गुंतवणूक करणाराच असतो.
  • साधारणतः पत्नी किंवा मुलांच्या नावावर उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोताच्या आधाराने खरेदी केलेल्या मालमत्तेला बेनामी मालमत्ता म्हटले जाते. तसेच विश्वस्त म्हणूनही संपत्तीचा अधिकार आपल्याकडे ठेवला असेल तर तेही याच प्रकारात मोजले जाते. याचाच अर्थ तुम्ही आई-वडिलांच्या नावावरही संपत्ती खरेदी केली तरीही ते बेनामी ठरते. 
  • संसदेने बेनामी ट्रँझॅक्शन प्रोहिबिशन कायदा संमत केला, यामध्ये योग्य पद्धतीने पारदर्शक कारभार करणा-या धार्मिक ट्रस्टना सरकारने दिलासा दिला आहे.
  • या कायद्यानुसार दोषी व्यक्तीला सात वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही एकदम अशी शिक्षा सुनावली जाऊ शकते. 
  • काळा पैसा वापरून बेनामी संपत्ती निर्माण करणा-या भ्रष्ट लोकांविरोधात हा कायदा एक मोठे पाऊल समजले जाते.
  • बेनामी संपत्तीत लोक काळा पैसा गुंतवतात, कर बुडवल्यामुळे सरकारच्या महसुलाचेही नुकसान होते. त्यामुळेच काळ्या पैशाचा आधार बनणा-या या संपत्तीला जप्त करण्यासाठी सरकार वेगाने प्रयत्न करत आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीblack moneyब्लॅक मनीPoliticsराजकारण