शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोसावी समाजाचा मूक मोर्चा निवेदन : अत्याचार पीडितांना न्याय मिळण्याची मागणी (बातमीला जोड आहे) बातमीचे इन्फो,फोटो क्रमांक,कॅप्शन जोडमध्ये आहे

By admin | Updated: October 9, 2016 00:05 IST

नाशिक : कोपर्डी, नाशिक व पाथर्डी येथील अत्याचाराच्या घटना मानवी हक्कांना बाधीत करणार्‍या असून पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील मूकबधिर मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केल्यास ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी संशयित आरोपीने दिली. या प्रकाराने मानवी संस्कृती आणि भारतीय घटनेला धक्का पोहोचविणारा प्रकार घडल्याचे सांगत मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ गोसावी समाजाने शनिवारी (दि.८) मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले.

नाशिक : कोपर्डी, नाशिक व पाथर्डी येथील अत्याचाराच्या घटना मानवी हक्कांना बाधीत करणार्‍या असून पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथील मूकबधिर मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केल्यास ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी संशयित आरोपीने दिली. या प्रकाराने मानवी संस्कृती आणि भारतीय घटनेला धक्का पोहोचविणारा प्रकार घडल्याचे सांगत मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ गोसावी समाजाने शनिवारी (दि.८) मोर्चा काढून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. अहमदनगर जिल्‘ातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिक आणि पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथेही अशाच प्रकारे पाशवी अत्याचाराच्या घटना घडल्याने समाजातील विविध घटकांमध्ये संतापाचे वातावरण असून विविध समाज मूक मोर्चाच्या माध्यमातून या घटनांचा निषेध नोंदवत आहे. अशाप्रकारचे माणुसकीला काळिमा फासणारे व घृणास्मद कृत्य करणार्‍या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी गोसावी समाजाने शनिवारी पंचवटीतील रामकुं ड परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर समाजातील श्रद्धा भारती, निशा गोसावी, आदिती भारती, मानसी गोसावी, स्नेहा गोसावी या पाच मुलींनी प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. या निवेदनाच्या माध्यमातून अशाप्रकारच्या गुन्ह्यामध्ये दोषी असणार्‍या नराधमांविरोधात कडक कारवाई करावी, तसेच महाराष्ट्रात एका मागून एक घडत असलेल्या अशा निंदणीय घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात जलदगती न्यायालयात खटले चालवावे, अशी मागणीही या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान, हुतात्मा स्मारक येथे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. के . गोसावी, प्रदेशाध्यक्ष दत्ता गिरी, जिल्हाध्यक्ष सूर्यभान गोसावी आदिंनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. सरचिटणीस वसंत गोसावी, सुधाकर गवळी, बापू बैरागी, मुक्तेश्वर मुनशे˜ीवार, योगेश बर्वे, संजय गोसावी आदिंसह समाजबांधव उपस्थित होते. वसंत गोसावी सूत्रसंचालन करून आभार मानले.

शिक्षण घ्यायचे कसे- पंचकन्यांचा सवाल जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिल्यानंतर हुतात्मा स्मारक येथे पंचकन्यांनी निवेदन वाचून दाखवले. समाजातील मुलींची सुरक्षिता धोक्यात असल्याचे सांगत प्रशासनाने महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मुलींना शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागते. अशावेळी मुलींची सुरक्षितता महत्त्वाची आहे. सुरक्षित वातावरण नसेल तर मुलींनी शिक्षण घ्यायचे कसे, असा सवालही या पंचकन्यांनी उपस्थित केला.