शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! सायबर सिक्युरिटीमध्ये नोकऱ्यांचा सुकाळ

By admin | Updated: November 2, 2016 12:21 IST

सायबर सिक्युरिटी देणाऱ्या तज्ज्ञांच्या मागणीत वाढ झाली असून, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत.

ऑनलाइन लोकमत
 हैदराबाद, दि. 2 -  गेल्या काही काळात इंटरनेटच्या वापरामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. मोठमोठ्या कंपन्यांपासून वैयक्तिक पातळीवरही इंटरनेटचा वापर अपरिहार्य झालाय. मात्र इंटरनेटच्या वाढत्या वापराबरोबच सायबर सिक्युरिटीचे आव्हानही उभे राहिले आहे. त्यामुळे सायबर सिक्युरिटी देणाऱ्या तज्ज्ञांच्या मागणीत वाढ झाली असून, सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये नोकऱ्यांचा सुकाळ राहणार आहे.
मोठ्या आणि लहान कंपन्यांसोबतच छोटे छोटे स्टार्ट अप उद्योजक देखील आता सायबर सिक्युरिटी कर्मचाऱ्याची नियुक्ती करू लागले आहेत. कंपन्यांबरोबरच अनेक ग्राहक स्वत:चा महत्त्वपूर्ण डाटा सुरक्षित ठेवण्यासाठी डाटा सिक्युरिटी इंजिनिअरची मदत घेत आहेत. त्यामुळे डाटा सिक्युरिटीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे तेलंगणा माहिती तंत्रज्ञान असोसिएशनचे (टीआयटीए) संस्थापक सुदीप कुमार  माक्थाला यांनी सांगितले. 
('सायबर लॅबमुळे गुन्हेगारीला आळा')
सायबर सिक्युरिटी पदवी असणाऱ्यांच्या पगाराची सरासरीही इतर  क्षेत्रातील इंजिनिअर्सपेक्षा अधिक आहे. सायबर सिक्युरिटीची पदवी घेणाऱ्या फ्रेशर्सना 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. तर अन्य क्षेत्रात मिळणाऱ्या पगाराची सरासरी ही 2.5 लाख ते 3.6 लाख एवढी आहे. 
(पाकचे आता सायबर अटॅक, आयटी कंपन्यांना लक्ष्य)
"सायबर सुरक्षेसाठी स्वयंचलित सायबर सिक्युरिटी यंत्रणा उपलब्ध असली तरी ती सिक्युरिटी तज्ज्ञासाठी पर्याय ठरू शकत नाही. कारण सायबर गुन्हेगारांकडून अललेला धोका दररोज नवनव्या रूपात आपल्या समोर येत असतो.  तो मालवेअर किंवा व्हायरसच्या स्वरूपात असू शकतो.  त्यामुळे  त्याच्यावर सातत्याने नजर ठेवावी लागते," असे एका आघाडीच्या आयटी कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.