शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

लाखो केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी खूशखबर; वर्षभरापासून थकलेला महागाई भत्ता मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 10:26 AM

Central Government Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढही केली जाते. गेल्या वर्षीपासून तीन हप्ते थकले होते.

केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा दिलासा दिला आहे. सध्याच्या या महागाईच्या दिवसात एकतर नागरिक पिचलेले आहेत. सरकारने सांगितले की, 1 जुलै 2021 पासून पूर्ण महागाई भत्ता (DA) दिला जाणार आहे. सोबतच चालू वर्षीचा जो तीन वेळचा महागाई भत्ता थकलेला आहे तो देखील मिळणार आहे. (7th Pay Commission: Three pending DA instalments to be restored for central govt employees.)

अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी संसदेत याची माहिती दिली. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा थकलेला महागाई भत्ता जुलै 2021 मध्ये दिला जाणार आहे. कोरोना संकटामुळे केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 असे तीन हप्ते रोखले होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा केंद्राच्या 50 लाख कर्मचाऱ्यांबरोबर 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. राज्यसभेत एका लिखित उत्तरात अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, जेव्हा भविष्यात 1 जुलै 2021 च्या महागाई भत्त्यासाठी निर्णय घेतला जाईल तेव्हा थकलेल्या तीन वेळच्या भत्ताही दिला जाणार आहे. 

महागाई भत्त्यातून किती वाचले...अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, तीन वेळचा महागाई भत्ता रोखल्याने सरकारचे जवळपास 37,530.08 रुपये वाचले होते. यामुळे कोरोनाकाळातील आर्थिक संकटाचा सामना करण्यास मदत मिळाली आहे. 

किती भत्ता मिळतो...केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ पगाराच्या 17 टक्के महागाई भत्ता दिला जातो. या महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढही केली जाते. सध्याचा भत्ता हा जुलै 2019 पासून लागू आहे. यामध्ये जानेवारी 2020 मध्ये वाढ करण्यात येणार होती. हा भत्ता 4 टक्क्यांनी वाढून 21 टक्के करण्यास मंजुरीदेखील मिळाली होती. परंतू अद्याप तो लागू करण्यात आलेला नाहीय.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEmployeeकर्मचारीPensionनिवृत्ती वेतन