शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

#GoodBye2017 : वर्षभरातील राजकीय घडामोडींवर एक नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 5:42 PM

भाजपामध्ये घुसमट झाल्याने सत्तेतील पक्षातून बाहेर पडून काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाला पंजाबमध्ये सत्ता मिळवून देणारा एक बाणेदार नेता म्हणून नवज्योतसिंग सिद्धूने गतवर्षात आपली ओळख निर्माण केली

यादवांमधील यादवीउत्तर प्रदेशात गेली कित्येक वर्षे राजकीय वर्चस्व असलेल्या समाजवादी पार्टीला २०१७ सालाच्या सुरुवातीलाच मोठे झटके बसले. पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव आणि पुत्र अखिलेश यांच्यातील मतभेद टोकाला गेले. अन् मिटलेही.मार्चमध्ये होणा-या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाला गृहकलहाचे ग्रहण लागले होते.पिता मुलायमसिंह यादव यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी पटत नसल्याने अखिलेश यांनी सरळ सरळबंड केले. त्यांचे सायकल चिन्ह अधिकृतपणे कोणाला द्यायचे इथपर्यंत वाद विकोपाला गेला असताना पितामुलायमसिंह यांनी नमते घेत अचानक यू टर्न घेतला. पक्षाला निवडणुकीत पराभव झाला आणि भाजपाला निर्णायक बहुमत मिळाले तरी पिता-पुत्रांमधील वाद वर्षाच्या प्रारंभी चर्चेचा विषय झाला होता.भारत- चीन-पाकभारतीय उपखंडातील भारताशेजारील श्रीलंका वगळता पाकिस्तान आणि चीन या देशांशी असलेल्या संबंधात गेल्या वर्षात काहीच फरक पडला नाही. पाकिस्तानकडून वर्षभरात ७३० वेळा गोळीबार करण्यात आला आहे तर चीनकडूनही अधूनमधून कुरापती केल्या आहेत; मात्र या सगळ्यामागे चीनमधील निवडणुका आहेत असे तज्ज्ञांचे मत आहे. पण पाकिस्तानच्या भूमिकेत बदल झालेला नाहीगुजरातच्या निकालाने काँग्रेसला नवी उभारीकेंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारला नोटाबंदीवरून विरोधकांनी लक्ष्य केले तरी नोटाबंदीनंतर अवघ्या चार महिन्यांत लागलेल्या उत्तर भारतातील निवडणुकांमध्ये भाजपाने मिळवलेले यश आणि मुख्यमंत्री पदी योगींची नियुक्ती यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली होती. आता भाजपाचा वारू रोखणे कठीण आहे असे वाटत असताना वर्षाच्या अखेरीस काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत गुजरातमध्ये मोदींविरोधात वातावरण तयार करण्यात यश मिळवले; मात्र हिमाचल काँग्रेसला गमवावे लागले. तसे पाहिले तर हिमाचल, कर्नाटक, तामिळनाडू ही राज्ये सतत सत्तांतर घडवणारी राज्ये म्हणूनच ख्यात आहेत. हिमाचल गेले तरी गुजरातमध्ये काँग्रेसचे संख्याबळ वाढवण्यात राहुल गांधींच्या नेतृत्वाला यश आल्याने काँग्रेसला ऊर्मी आल्याचे दिसून आले. यावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी पक्षात मोठे बदल करण्याची सूचना केली.ईशान्येत फुलले कमळपीपल्स पार्टी आॅफ अरुणाचल प्रदेश या पक्षाची सत्ता असताना त्यांच्यामध्ये फूट पाडून त्यांच्या ३३ आमदारांना भाजपामध्ये प्रवेश दिला. आपल्या १२ आमदारांसह भाजपाने अरुणाचल प्रदेशात सत्ता मिळवण्यात यश मिळवले. ६०पैकी ४७ सदस्य भाजपाचे तिथे निर्णायक बहुमत झाले.करुणानिधी भेट : तामिळनाडूच्या जनतेने भलेही सत्तांतर घडवले असेल; पण स्थानिक द्रमुकशिवाय इतर कोणत्याही राष्टÑीय पक्षाला त्यांनी कधी शिरकाव करू दिला नाही. अण्णा द्रमुकच्या नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षात उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुकचे नेते एम. करुणानिधी यांची घेतलेली भेट नव्या राजकारणाची नांदी असू शकेल.भाजपाला धडा : नोटाबंदीची नाराजी असूनही उत्तर प्रदेशात भाजपाची चांगली सुरुवात झाली. मात्र वर्षअखेरीस गुजरातमध्ये कमी झालेले संख्याबळ भाजपाला धडा शिकवून गेले. वर्षभरात उत्तर प्रदेश, हिमाचल आणि अरुणाचल प्रदेशात सत्ता मिळवण्यात भाजपाला यश आले आहे. नोटाबंदीवरून विरोधकांनी लक्ष्य केले तरी नोटाबंदीनंतर चार महिन्यांत लागलेल्या उत्तर भारतातील निवडणुकांमध्ये भाजपाने मिळवलेले यश आणि मुख्यमंत्री पदी योगींची नियुक्ती यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली होती.यांनी गाजवले वर्ष

  • शशिकला

तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांची मैत्रीण म्हणून वावरणाºया शशिकला यांनी सत्ताकेंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आणि त्यांना जेलची हवा खावी लागली. घाईघाईने पक्षसरचिटणीपदी विराजमान झालेल्या शशिकलांची मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने भंगली असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे

  • हार्दिक पटेल

पंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध जहरी टीका करणारा युवा नेता म्हणून हार्दिक पटेल यांचे नाव वर्षभर चर्चेत राहिले. गुजरातमध्ये त्यांनी भाजपाविरुद्ध रान उठवले आणि भाजपाला कडवे आव्हान उभे केले. नाही म्हटले तरी पटेल समुदायामध्ये याचा भाजपाला फटका बसला

  • नवज्योतसिंग सिद्धू

भाजपामध्ये घुसमट झाल्याने सत्तेतील पक्षातून बाहेर पडून काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाला पंजाबमध्ये सत्ता मिळवून देणारा एक बाणेदार नेता म्हणून नवज्योतसिंग सिद्धूने गतवर्षात आपली ओळख निर्माण केली आहे. माजी क्रिेकेटवीर असलेले सिद्धू पंजाबमध्ये सध्या मंत्रिमंडळात आहेत.

  • डोनाल्ड ट्रम्प

२०१७ सालाच्या प्रारंभी अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली. वर्षाच्या अखेरीस उत्तर कोरियाने केलेल्या स्फोटक शस्त्रांच्या चाचणीने अवघे जग हादरून गेले असून कोरियाला एकटे पाडण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पुढाकार घेतला. जगातील सर्व राष्टÑांनी कोरियाविरुद्ध एक व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Politicsराजकारण