Golden opportunity of government job for 10th, 12th passers; Salary up to 81100, find out ... | Government Job: 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या...

Government Job: 10 वी, 12 वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 81100 पर्यंत पगार, जाणून घ्या...

DSSC Group C Recruitment 2021: डिफेंस सर्व्हिस स्टाफ कॉलेज (Defence Services Staff College) ने विविध जागांवर भरतीचे आयोजन केले आहे. यासाठी 10 वी आणि 12 वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यानुसार स्टेनोग्राफर, LDC, सिव्हिल मोटर ड्रायव्हर, कारपेंटर आणि MTS आदी पदांवर इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (DSSC Recruitment 2021: Apply for 83 Multi-Tasking Staff, clerk and other posts.)


ग्रुप सी पदांसाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. 


Defence Services Staff College (DSSC) Recruitment 2021: पदांचे विवरण...
स्टेनोग्राफर- 4 पद
लोअर डिव्हिजन क्लार्क- 10 पद
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर- 7 पद
मल्टी टास्किंग स्टाफ- 60 पद
अन्य - 2 पद


शैक्षणिक योग्यता आणि परिक्षेचे स्वरुप...
स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12 वी किंवा समकक्ष परीक्षा पास होणे गरजेचे आहे. स्कील टेस्ट नॉर्मनुसार 10 मिनिटांत 80 शब्द टायपिंग पाहिले जाणार आहे. याशिवाय 50 मिनिटांत इंग्रजी, 65 मिनिटांत हिंदी असे कॉम्प्युटरवर ट्रान्सलेशन करावे लागणार आहे. 

लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची 12 वी उत्तीर्ण गरजेचे आहे. तसेच स्कील टेस्टमध्ये इंग्रजी 35 शब्द प्रती मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रती मिनिट टायपिंग स्पीड असणे गरजेचे आहे. 

सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर पदासाठी 12 वी उत्तीर्ण, आणि अवजड वाहनांचे लायसन असणे गरजेचे आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेमध्ये दोन वर्षांचा वाहन चालविण्याचा अनुभवही गरजेचा आहे. 

मल्टी टास्किंग स्टाफ- यासाठी दहावी पास होणे गरजेचे आहे. 

पगार- 
स्टेनोग्राफर (Stenographer) - 25500 ते 81100 रुपये
 लोअर डिव्हिजन क्लार्क (Lower Division Clerk)- 19900 रुपये ते 63200 रुपये
सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (Civilian Motor Driver) - 19900 रुपये ते 63200 रुपये
सुखानी (Sukhani)- 19900 रुपये ते 63200 रुपये
कारपेंटर (Carpenter) - 19900 रुपये ते 63200 रुपये
मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)- 18000 रुपये ते 56900 रुपये

निवड कशी केली जाणार...
DSSC ग्रुप सी अंतर्गत उमेदवारांची निवड लिखित परीक्षा, स्किल/फिजिकल टेस्ट आधारे केली जाणार आहे. कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 

अधिकृत नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा...

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Golden opportunity of government job for 10th, 12th passers; Salary up to 81100, find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.