सहाव्या दिवशीही सोन्याचा भाव घटला

By Admin | Updated: September 6, 2014 03:02 IST2014-09-06T03:02:20+5:302014-09-06T03:02:20+5:30

स्टॉकिस्टांद्वारे सातत्यपूर्ण विक्री झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या भावात सलग सहाव्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे.

Gold prices declined on the sixth day | सहाव्या दिवशीही सोन्याचा भाव घटला

सहाव्या दिवशीही सोन्याचा भाव घटला

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर स्थितीच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांद्वारे सातत्यपूर्ण विक्री झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या भावात सलग सहाव्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव 9क् रुपयांच्या घसरणीसह 27,77क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांकडून मागणीचे पाठबळ न मिळाल्याने चांदीचा भावही चौथ्या दिवशी घटला. आज चांदीचा भाव 2क्क् रुपयांच्या घसरणीसह 42,क्क्क् रुपये प्रतिकिलोवर आला.
कमजोर जागतिक संकेतांच्या पाश्र्वभूमीवर स्टॉकिस्टांनी विक्रीचा रोख कायम ठेवल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंचे भाव घसरले. याशिवाय आभूषण विक्रेते व किरकोळ विक्रेत्यांची मागणी कमजोर झाल्यानेही बाजार धारणोवर नकारात्मक परिणाम झाला.
देशांतर्गत बाजाराचा कल निश्चित करणा:या न्यूयॉर्कमध्ये काल सोन्याचा भाव क्.66 टक्क्यांनी घटून 1,26क्.9क् डॉलर प्रतिऔंस व चांदीचा भावही क्.57 टक्क्यांनी घटून 19.क्6 डॉलर प्रतिऔंसवर आला.
दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 9क् रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे 27,77क् रुपये व 27,57क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. गेल्या पाच सत्रंत सोन्याचा भाव 44क् रुपयांनी स्वस्त झाला आहे. तथापि, मर्यादित व्यवहारामुळे आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,5क्क् रुपयांवर कायम राहिला.
तयार चांदीचा भावही 2क्क् रुपयांनी घटून 42,क्क्क् व चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 85 रुपयांच्या घसरणीसह 41,65क् रुपये प्रतिकिलो राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 
 
 
 
 
 

 

Web Title: Gold prices declined on the sixth day