बकऱ्या चोर अटकेत
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:37+5:302015-08-26T23:32:37+5:30
बकऱ्या चोरणारी टोळी गजाआड

बकऱ्या चोर अटकेत
ब ऱ्या चोरणारी टोळी गजाआडदोघांना अटक : एक पसार, करभांड शिवारातून चार बकऱ्या जप्तपारशिवनी : नागपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांहून बकऱ्या चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. एक पसार असून पोलीस तपास करीत आहे. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींकडून कारसह चार बकऱ्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई मंगळवारी पहाटेच्या सुमारास पारशिवनी पोलिसांनी केली. रूपेश नंदकिशोर पांडे (२१, रा. शांतीनगर कॉलनी, नागपूर) आणि राहुल कमल मालिकपुरी (२३, रा. पिवळी नदी, कामठी रोड, नागपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर रूपेश पाली (३५, रा. जरीपटका, नागपूर) हा पसार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर जिल्ह्यातील बऱ्याचशा भागातून बकऱ्या आणि मोटारपंप चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत. पारशिवनी तालुक्यातील नयाकुंड, करंभाड, पालोरा, गुंढरी, इटगाव, तामसवाडी, डोरली, साहोली, सिंगोरी, पारडी येथूनही जनावरे चोरी गेली. अशाचप्रकारे नितीन सेवकराम फुले(३०, रा.करंभाड) याने २४ ऑगस्टला रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील अंगणात एकूण २२ बकऱ्यासह लाकडी खुंट्याला तीन बोकड बांधलेले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बकऱ्या ओरडण्याचा आवाज आला. तसेच कुत्रे भुंकू लागले. त्यामुळे नितीनला जाग आल्याने तो घराबाहेर निघाला असता त्याला एमएच-३०/एल-६८११ क्रमांकाची व्हॅन दिसून आली. त्यात फिर्यादीच्या चार बकऱ्या कोंबल्याचे दिसले. त्याने आरडाओरड करताच आरोपींनी तेथून पळ काढला. याबाबत त्याने पारशिवनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी गस्तीदरम्यान व्हॅनसह बकऱ्या जप्त केल्या. तसेच आरोपींना अटक केली. पोलिसांनी आरोपींची विचारपूस केली असता त्यांनी सावनेर तालुक्यातील कोथुळणा-निमतलाई येथून बकऱ्या चोरून आणल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल टिकाराम जाधव, योगेश झोडापे, हरीश सोनभद्रे, संदीप नागरे, राजू रेवतकर यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)