गोवावासीयांनी काही करून दाखविण्याची शेवटची संधी दिली आहे -दिग्विजयसिंग

By Admin | Updated: March 13, 2017 00:51 IST2017-03-13T00:51:16+5:302017-03-13T00:51:16+5:30

गोव्याच्या जनतेने काँग्रेसला काही करून दाखविण्याची शेवटची संधी दिलेली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे

Goaites have given the last chance to do something - dvvijayasingh | गोवावासीयांनी काही करून दाखविण्याची शेवटची संधी दिली आहे -दिग्विजयसिंग

गोवावासीयांनी काही करून दाखविण्याची शेवटची संधी दिली आहे -दिग्विजयसिंग

पणजी : गोव्याच्या जनतेने काँग्रेसला काही करून दाखविण्याची शेवटची संधी दिलेली आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे.
काँग्रेसने ४० सदस्यीय गोवा विधानसभेच्या १७ जागा जिंकल्या आहेत तर भाजपाला १३ जागा आणि इतर पक्षांना १० जागा मिळाल्या आहेत. ‘गोव्याच्या जनतेने काँग्रेसला काहीतरी करून दाखविण्याची किंवा संपण्याची ही शेवटची संधी दिलेली आहे. देव आमची मदत करो,’ असे दिग्विजयसिंग यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे. २०१२ मध्ये गोव्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्याचा उल्लेख करून दिग्विजयसिंग म्हणाले, ‘आम्ही धडा घेतला आहे. भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. आम्ही गोवा आणि गोवावासीयांसाठी प्रामाणिकपणाने काम करू. २०१२ मध्ये केलेल्या चुकांची पुनरावृत्ती २०१७ मध्ये केली जाणार नाही. आम्ही निर्धारित वेळेत दिलेली आश्वासने पूर्ण करू.’ आणखी एका टिष्ट्वटमध्ये दिग्विजयसिंग म्हणतात, ‘आम्हाला खंडित जनादेश मिळाला आहे.

Web Title: Goaites have given the last chance to do something - dvvijayasingh