Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:50 IST2025-12-28T16:48:58+5:302025-12-28T16:50:07+5:30
Giriraj Singh And Mamata Banerjee : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्या विधानाचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीएमसी खासदार सौगत रॉय यांच्या एका विधानाचा समाचार घेताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सौगत रॉय म्हणाले होते की, "ममता बॅनर्जी यांना बंगालपेक्षा बांगलादेशात जास्त पसंती मिळते." यावर प्रत्युत्तर देताना गिरिराज सिंह म्हणाले, "जर ममता बॅनर्जी बांगलादेशात इतक्या लोकप्रिय असतील, तर त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना सोबत घेऊन तिथेच जावं आणि तिथेच पंतप्रधान व्हावं... आम्ही बंगालला बांगलादेश होऊ देणार नाही."
ममता बॅनर्जी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांसाठी 'रेड कार्पेट' अंथरतात आणि हिंदूंच्या हत्या घडवून आणतात असं म्हणत सिंह यांनी निशाणा साधला. तसेच सौगत रॉय यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी "जर ममता बांगलादेशात जास्त लोकप्रिय आहेत, तर त्यांनी बंगालला सोडावं आणि आपल्या घुसखोरांसह तिकडेच निघून जावं" असा खोचक टोला लगावला आहे.
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
"काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष"
काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी भाजपा आणि आरएसएसच्या संघटनात्मक क्षमतेचे कौतुक केले होते. यावर बोलताना गिरिराज सिंह म्हणाले, "दिग्विजय सिंह यांनी आमची प्रशंसा केली की नाही, याची मला गरज नाही. भाजपा हा कार्यकर्त्यांचा आणि राष्ट्रभक्तांचा पक्ष आहे, तर काँग्रेस हा घराणेशाहीचा पक्ष आहे. काँग्रेस हा नेहरू-गांधी घराण्याची चाकरी करणारा पक्ष आहे."
"आम्ही हिंदू आहोत"
घरात शस्त्र ठेवण्याच्या आवाहनावर स्पष्टीकरण देताना गिरिराज सिंह म्हणाले की, "आम्ही हिंदू आहोत... सनातन धर्मात शास्त्र आणि शस्त्र या दोन्हीची पूजा केली जाते. आमचे देवी-देवता देखील शास्त्र आणि शस्त्रांनी सुसज्ज असतात, त्यामुळे त्यांच्या भक्तांनी देखील त्याच परंपरेचं पालन केलं पाहिजे."
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
भारतीय जनता पक्षाचे नेते दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्येही हिंदू असुरक्षित आहेत, तर मुख्यमंत्री गप्प आहेत असं म्हणत निशाणा साधला आहे. बांगलादेशच्या मुद्द्याबाबत भाजपा नेते दिलीप घोष यांनी सांगितलं की, देशाच्या फाळणीपासून बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्येही हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनांवर पूर्णपणे गप्प आहेत. सरकारही कोणतीही कारवाई करत नाही.