Ramdev Baba: 'नुसत्या धोतरावर कोविड सेंटरमध्ये जाऊन दाखवा'; टीव्ही डिबेटमधील आव्हानावर रामदेव बाबा भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 10:48 PM2021-05-24T22:48:53+5:302021-05-24T23:09:56+5:30

Ramdev Baba got angry: रामदेव बाबांनी यानंतर ट्विट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले आहेत. अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही असा सवाल केला आहे.

'Go to the Covid Center on Dhotar'; Ramdev Baba got angry in a TV debate on the challenge | Ramdev Baba: 'नुसत्या धोतरावर कोविड सेंटरमध्ये जाऊन दाखवा'; टीव्ही डिबेटमधील आव्हानावर रामदेव बाबा भडकले

Ramdev Baba: 'नुसत्या धोतरावर कोविड सेंटरमध्ये जाऊन दाखवा'; टीव्ही डिबेटमधील आव्हानावर रामदेव बाबा भडकले

Next

योग गुरु रामदेव बाबा  (Baba Ramdev)  यांनी आज पुन्हा डॉक्टरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी आरोग्य मंत्र्यांन झापताच रामदेव बाबांनी अॅलोपथीवरील वक्तव्य मागे घेत असल्याचे म्हटले होते. मात्र, आज त्यांनी मी कोणतीही पदवी न घेता डॉक्टर बनलो, अॅलोपथीचे डॉक्टर कोरोनामुळे मृत्यूमुखी कसे पडतात असा सवाल केला आहे. य़ावर टीव्ही डिबेटमध्ये आयएमएच्या माजी अध्यक्षांनी एक आव्हान दिल्याने रामदेव बाबा भडकले आहेत. (Ramdev baba got angry on IMA ex president challenge in TV debate.)

Baba Ramdev: आता रामदेव बाबांनी उडविली डॉक्टरांची खिल्ली; बोलले, ''डिग्रीशिवाय मी बनलो डॉक्टर''


रामदेव बाबा यांची एका टीव्ही डिबेटवेळी आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांच्यासोबत वाद झाला. अॅलोपथीकडे अनेक आजारांवर काहीच उपचार नाहीत. आय़ुर्वेदामध्ये बीपी, शुगर, थायरॉईडसारख्या आजारांवर उपचार आहेत. कोरोना लसीचे दोन डोस घेवूनही हजारावर डॉक्टरांनी आपले प्राण गमावले आहेत, असे वक्तव्य रामदेव बाबांनी केले. यावर शर्मा यांनी कोविड सेंटरच्या लेव्हल ३ मध्ये धोतरावर जाऊन काम करून दाखवा, असे आव्हान दिले.  यावर रामदेव बाबा भडकले, तुम्ही माझा कुर्ता, लंगोट काढू नका. स्वत:ला सर्व शक्तीमान समजू नका. 


तुम्ही योग सायन्सचा सन्मान करा. आमच्याकडे गंभीर आजारांवर उपचार आहे. माझ्याकडे एक कोटी लोकांची माहिती आहे, ज्यांना आम्ही बरे केले आहे. गंभीर रुग्ण, सर्जरी, लाईफ सेव्हिंग ड्रग्स सोडून मी दावा करतो की साऱ्या रोगांवरील उपचार आमच्याकडे आहेत. मी मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तुम्ही य़ोग सायन्सचा करा, असे रामदेव बाबा म्हणाले. 



रामदेव बाबांनी यानंतर ट्विट करत आयएमएला २५ प्रश्न विचारले आहेत. अमेरिकेचे डॉक्टर बोलतात, डब्ल्यूएचओ म्हणते तेव्हा का नाही बोलत कोणी? मी जर डॉक्टरांचा आणि मेडिकल सायन्सचा सन्मान करतो, तर तुम्ही आयुर्वेदाचा सन्मान का करत नाही असा सवाल केला आहे. आयुर्वेदावर टीका करणे, शिव्या का दिल्या जातात. फार्मा कंपन्या खूप आहेत, मग डॉक्टर त्यांचे बळी का ठरत आहेत. डॉक्टर तर एका फार्मा कंपनीचा प्रतिनिधी नसतो, अशा शब्दांत रामदेव बाबांनी सवाल केले आहेत. 

Web Title: 'Go to the Covid Center on Dhotar'; Ramdev Baba got angry in a TV debate on the challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.