गो एअरवेजच्या विमानाचे इंजिन हवेतच झाले बंद...सदोष इंजिनांचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 15:34 IST2018-09-02T15:32:32+5:302018-09-02T15:34:23+5:30
विमानात वापरण्यात येणारे नियो इंजिनमध्ये कोणताही दोष नसल्याचा अहवाल नुकताच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे.

गो एअरवेजच्या विमानाचे इंजिन हवेतच झाले बंद...सदोष इंजिनांचा फटका
बंगळुरु : बंगळुरुहून पुण्यासाठी उड्डाण भरलेल्या गो एअरवेजच्या विमानाचे इंजिन हवेतच बंद पडल्याने विमानाचे आतप्कालीन लँडींग करण्यात आले. या विमानाने शनिवारी बंगळुरुहून पुण्याकडे उड्डाण केले होते.
विमानतळावरील अधिकाऱ्यांनुसार गो एअरवेजच्या विमानाच्या नियो इंजानामध्ये बिघाड झाल्याने विमानाची इमरजन्सी लँडींग करावी लागली. विमानातील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असून या प्रकाराची चौकशी केली जात आहे. याचबरोबर गो एअरवेजने प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आहे.
हैदराबादमध्येही विमानाचे इमरजन्सी लँडींग
बंगळुरुमधील घटनेनंतर शनिवारी रात्री उशिरा हैदराबाद विमानतळावरही एयर एशियाच्या विमानाची इमरजन्सी लँडींग करण्यात आली. हे विमान अमृतसरहून बंगळुरुला जात होते. यावेळी पायलटांना विमानातून धूर येत असल्याचे दिसले. यानंतर ट्रॅफिक कंट्रोलने तात्काळ विमान हैदराबाद विमानतळावर उतरविण्यास सांगितले. याचीही चौकशी करण्यात येत आहे.
GoAir flight G8-283 from Bengaluru to Pune made an emergency landing at Bengaluru airport due to a major snag in engine mid-air, yesterday pic.twitter.com/nhAdOI45x4
— ANI (@ANI) September 2, 2018
नियो इंजिन सदोष?
विमानात वापरण्यात येणारे नियो इंजिनमध्ये कोणताही दोष नसल्याचा अहवाल नुकताच नागरी विमान वाहतूक संचालनालयाने दिला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत निओ इंजिनमध्ये बिघाड झाल्याच्या बऱ्याच घटन समोर आल्या आहेत. परुंतू, याकडे डीजीसीए लक्ष देत नसल्याचे स्पष्ट होत आहे.